तळमावले : शिवसमर्थ परिवाराने दिलेल्या वॉटर प्युरिफायर यंत्रणेच्या उद्घाटन प्रसंगी तहसीलदार योगेश्वर टोंपे, उपमहाव्यवस्थापक हेमंत तुपे व अन्य.
तळमावले | कृष्णाकाठ वृत्तसेवा :
ढेबेवाडी येथील कोविड हॉस्पिटलसाठी तळमावले येथील शिवसमर्थ परिवारातर्फे दोन व्हेंटिलेटर बेडची उपलब्धता करण्यात आली असून, आवश्यक तांत्रिक बाबींची पूर्तता झाल्यानंतर ते सेवेत दाखल होतील, असे सांगण्यात आले. दरम्यान, हॉस्पिटलमधील गैरसोय लक्षात घेऊन 'शिवसमर्थ'ने बसविलेल्या वॉटर प्युरिफायरचे उद्घाटन तहसीलदार योगेश्वर टोंपे यांच्या हस्ते करण्यात आले.
अँड. जनार्दन बोत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली १५ वर्षांपासून कार्यरत असलेला शिवसमर्थ परिवार सामाजिक बांधिलकी जोपासत सातत्याने गरजूंच्या मदतीला धावून जात आहे. या परिवाराची रूणवाहिका कोरोना रुग्णांसाठी २४ तास सेवेत आहे. येथील ग्रामीण रुग्णालयात कार्यरत कोविड हॉस्पिटलमध्ये व्हेंटिलेर बेड उपलब्ध नसल्याने रुग्ण व त्यांच्यानातेवाईकांची परवड सुरू होती.याबाबत जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केलेल्या आवाहनास प्रतिसाद देत प्रांताधिकारी श्रीरंग तांबे व तहसीलदार योगेश्वर टोंपे यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार अँड. बोत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसमर्थ परिवाराने दोन व्हेंटिलेटर बेड देण्यास तयारी दर्शवत तातडीने त्याची उपलब्धताही केली. दरम्यान, याच हॉस्पिटलमध्ये “शिवसमर्थ'ने बसविलेल्या वॉटरप्युरिफायरचे उद्घाटन योगेश्वर टोंपेयांच्या हस्ते झाले. 'शिवसमर्थ'चे उपमहाव्यवस्थापक हेमंत तुपे,मंडलाधिकारी प्रवीण शिंदे, डॉ.भूषण वराडे, डॉ. कोमल लोकरे, 'प्रहार'च्या विद्या कारंडे, माधुरी सोनवणे, अनिता बकरे, अमितनिकम आदी उपस्थित होते.