वाढदिवस साजरा न करण्याचे पनवेलच्या नगरसेवकांचे आवाहन


पनवेल  | कृष्णाकाठ वृत्तसेवा : आपले अनेक कार्यकर्ते आणि रहिवाशी कोरोनामूळे बळी गेले असल्याने पनवेल महापालिकेचे नगरसेवक व प्रभाग समिती ब चे अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांनी आपला उद्या १ जून रोजीचा वाढदिवस कुणीही साजरा करू नये असे आवाहन केले आहे.

नगरसेवक एकनाथ गायकवाड हे पनवेलच्या आसूडगावचे रहिवाशी असून ते कोरोना योद्धा बनवून लोकांना सातत्याने मदत करत आले आहेत.त्यांनी सलग २५ दिवस कोरोना ड्युटीवरील पोलीस कर्मचाऱ्यांना चहा ,नाश्ता आणि गरजू लोकांना अन्नधान्य ,सॅनिटायझर आणि मास्कचे वाटप केले आहे. त्याचकाळात त्यांनाही कोरोनाची लागण झाली होती.त्यातून बरे झाले आहेत. पण आपले इतर काही कार्यकर्ते आणि रहिवाशी या कोरोनाला बळी पडले आहेत. त्यामुळे त्यांनी आपला वाढदिवस साजरा न करता गरजूंना कोरोना काळात वेगवेगळ्या माध्यमातून मदत करण्याचे आवाहन केले आहे.

Popular posts
तळमावले येथील वाल्मिकी विद्यामंदिरात २५ वर्षानंतर भरला पुन्हा दहावीचा वर्ग
इमेज
कुंभारगांव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील चिमुरड्यांनी भरवला बाजार
इमेज
येळगाव येथे मोफत त्वचा रोग निदान व औषधोपचार शिबीर संपन्न.
इमेज
जनविकास पतसंस्थेच्या आगाशिवनगर शाखेचा चौथा वर्धापन दिन उत्साहात साजरा.
इमेज
माथाडी कामगारांचे अस्तित्व टिकविण्यासाठी नरेंद्र पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा : गुलाबराव जगताप
इमेज