तळमावले/ कृष्णाकाठ वृत्तसेवा.
सलतेवाडी, वाझोली (ता.पाटण) येथील झिंगुबाई भैरु सलते यांचे शुक्रवार दि. 28 मे, 2021 रोजी वृध्दापकाळाने निधन झाले. त्यांचे वय 110 वर्षे होते. ‘झिंगु आजी’ या नावाने त्या परिसरात परिचित होत्या. त्यांच्या पश्चात एक मुलगा, दोन मुली, सुन, नातवंडे, परतवंडे असा मोठा परिवार आहे. पत्रकार संदीप डाकवे यांच्या त्या आजी होत.
त्यांचा रक्षाविसर्जन विधी रविवार दि. 30 मे, 2021 रोजी सकाळी 9 वाजता सलतेवाडी, वाझोली ता.पाटण, जि.सातारा येथे घेण्यात येणार आहे. मनमिळावू आणि प्रेमळ स्वभावाचे व्यक्तिमत्त्व असल्याने त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.