नगरसेविका आशाताई मराठे यांच्या मागणीमुळे नवे लसीकरण केंद्र सुरू.

 

लसीकरण केंद्राचे उदघाटन करताना भाजपाचे मुंबई अध्यक्ष व आमदार मंगलप्रभात लोढा ,नगरसेविका आशाताई  मराठे व मान्यवर.

मुंबई : कृष्णाकाठ वृत्तसेवा.

आपल्या देशावर कोरोना या संसर्गजन्य विषाणूंचे महाभयंकर संकट आले आहे. या वैश्विक महामारीत चेंबूर विभागांत कोविड १९ चा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी आणि कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी प्रभाग १५२ च्या भाजपच्या स्थानिक नगरसेविका आशाताई सुभाष मराठे यांच्या मागणीनुसार लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले.या लसीकरण केंद्राचे उदघाटन नुकतेच भाजपाचे मुंबई अध्यक्ष व आमदार मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते करण्यात आले. 

या कार्यक्रमप्रसंगी द.म.मुंबई जिल्हाध्यक्ष राजेश शिरवडकर , चेंबूर विधानसभा अध्यक्ष राहुल वाळंज उपस्थित होते. चेंबूर विधानसभेतील पदाधिकारी, कार्यकर्ते कार्यक्रमास उपस्थित राहून यशस्वीपणे संपन्न केला