माझगावमध्ये प्रतिबंधक लसीकरण सुविधा केंद्राचा शुभारंभ संपन्न

 

मुंबई | कृष्णाकाठ वृत्तसेवा : शिवसेना उपनेते, स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव व आमदार यामिनी जाधव यांच्या सूचनेनुसार तसेच प्रभाग क्रमांक २१० च्या स्थानिक नगरसेविका सोनम जामसुतकर व शिवसेना मा. नगरसेवक मनोज जामसुतकर यांच्या विशेष प्रयत्नाने व मुंबई पालिकेच्या सहकार्याने महापौर किशोरी पेडणेकर व खासदार अरविंद सावंत यांच्याहस्ते प्रभाग क्रमांक २१० मधील विभागातील नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुविधा केंद्र उपलब्ध करून देण्याचा शुभारंभ नुकताच माझगाव येथील खिलाफत हाऊस, मोतीशाह लेन या ठिकाणी करण्यात आला.

यावेळी स्थानिक नगरसेविका सौ. सोन जामसुतकर, शिवसेना मा. नगरसेवक मनोज जामसुतकर, मा.नगरसेवक सुर्यकांत पाटील,भायखळा विधानसभेचे समन्वयक बबन गावकर, विधानसभा संघटक विजय लिपारे, उपविभाग प्रमुख विजय कामतेकर,उपविभाग प्रमुख राम सावंत,भायखळा महिला विधानसभा संघटक सौ. चंदना साळुंखे, मुंबई विद्यापीठ सिनेट सदस्य निखिल जाधव,भायखळा विधानसभा युवासेना विभाग अधिकारी स्वप्निल बागवे, महिला विभाग अधिकारी श्रद्धा वाघमारे, शाखाप्रमुख हेमंत मयेकर,महिला शाखा संघटक मेघा भोईर आदी मान्यवर उपस्थित होते.तसेच पालिकेचे सहाय्यक अभियंता परिरक्षण जगताप,ज्युनिअर इंजिनिअर तुषार पाटील,

वैद्यकीय अधिकारी डॉ. आशिष, डॉ. विरेंदर तसेच खिलाफत हाऊसचे चेअरमन सरफराज आरजू,संचालक शारीख खान, डेकोरेटर्स मुक्तार मुल्ला तसेच युवासेनेचे महिला आघाडीचे व शिवसेनेचे अन्य सेल चे पदाधिकारी उपस्थित होते. शिवसेना नेते,राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे या कार्यक्रमाला उपस्थित राहून उपस्थितांना संबोधित केले.