मुंबई | कृष्णाकाठ वृत्तसेवा:
मुंबई - मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार आणि मनसे चित्रपट कर्मचारी सेना अध्यक्ष अमेय खोपकर ,कार्याध्यक्षा शालीनीताई ठाकरे , सरचिटणीस शशांक नागवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली संयुक्त सरचिटणीस विशाल हळदणकर व उपाध्यक्ष संजय देवळे यांनी मनसे सरचिटणीस संदिप दळवी व मंदार कर्णीक यांच्याहस्ते मास्टर दिनानाथ मंगेशकर नाट्यगृह येथील तिकीट विक्री कर्मचारी व सुरक्षा रक्षक यांना अन्न-धान्य वाटप करण्यात आले.
त्याप्रसंगी कामगार सेनेचे चिटणीस दिपक बोराडे, माजी विभाग अध्यक्ष रवी इंदुलकर , चित्रपट सेनेचे उपाध्यक्ष देवेंद्र मांजरेकर , सचिव विवेक म्हाडिक , म.न.वि.सेना सह संपर्क प्रमुख संदेश जगताप, मनसे चित्रपट सेना चिटणीस भगवंत झिटे, सह चिटणीस राकेश गुरव, रोहित बेंद्रे , कमलेश पाठक , निलेश विचारे , वाहतूक सेनेचे विभाग सचिव रतनेश खडपे, समीर काळे, उपशाखाध्यक्ष सतीश सुरवे ,मनोज बंगाले, विनीत साळुंखे आदी मान्यवर उपस्थित होते.