उंडाळे कोविड रुग्णालय रुग्णांसाठी ठरू लागले वरदान ; पहिले दहा रुग्ण कोरोनामुक्तउंडाळे : कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांचे स्वागत करताना डॉ. शेखर कोगनुळकर, डॉ. जयवंत थोरात आदी
( छायाचित्र : जगन्नाथ माळी )

उंडाळे | कृष्णाकाठ वृत्तसेवा :
उंडाळे ता. कराड येथे ग्रामीण रुग्णालयात नव्याने सुरू करण्यात  आलेल्या  कोरोना  केअर सेंटर मधून पहिले दहा कोरोना पाँझिटीव्ह रुग्ण बरे होऊन बाहेर पडल्याने उंडाळेचे कोरोना  केअर सेंटर या विभागासाठी आता वरदान ठरू लागले आहे. 

माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण व जिल्हा परिषद सदस्य अँड. उदयसिंह पाटील उंडाळकर यांच्या प्रयत्नातून उंडाळे येथे  30 बेडचे कोरोना  केअर सेंटर दक्षिण डोंगरी भागातील रुग्णांसाठी सुरू करण्यात आले. या कोरोना  केअर सेंटरचे उद्घाटन जिल्ह्याचे पालकमंत्री ना बाळासाहेब पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या शुभहस्ते करण्यात आल्यानंतर सुविधांअभावी हे कोरोना  केअर सेंटर काही दिवस बंद ठेवण्यात आले. पण तदनंतर येथे हळूहळू सुविधा आल्यानंतर या कोरोना केअर सेंटर मध्ये कोरोना लागण झालेले रुग्ण उपचारार्थ आणण्यात आले यापैकी  पहिल्या दाखल  दहा रुग्णांना कोरोना मुक्ती नंतर   त्यांचे स्वागत  करुन समारंभ पूर्वक  घरी सोडण्यात आले. या पहिल्या दहा रुग्णांचे  कोरोना  बरे झाल्यानंतर स्वागत उंडाळे  ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर शेखर कोगनुळकर डॉ. जयंत थोरात यासह कर्मचाऱ्यांनी केले 

कोरोना वर उपचार करून डिस्चार्ज मिळाल्यानंतर उपचारार्थ दाखल सर्वच रुग्णानी वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचे आभार मानत  उपलब्ध  सुविधा  बद्दल समाधान व्यक्त केले.