चिखलेवाडी (कुंभारगाव) येथे कोरोना चाचणी कॅम्प.

 

चिखलेवाडी येथील ग्रामस्थांची  कोरोना चाचणी करताना आरोग्य कर्मचारी. 

कुंभारगाव | कृष्णाकाठ वृत्तसेवा:

चिखलेवाडी (ता.पाटण) येथील एका कोरोना बाधित महिलेचा घरातच मृत्यू झाला असता नातेवाईकानीं आरोग्य विभागाला अंधारात ठेऊन अंत्यसंस्कार उरकल्याने खळबळ उडाली होती अंत्यसंस्काराला उपस्थीत सर्वाची झोपच  उडाली होती प्रतिबंध म्हणून प्रशासनाने आज गुरूवार दि.27 एप्रिल तळमावले प्राथमीक केंद्रा अंतर्गत अँटीजेन टेस्ट कॅम्प घेण्यात आला. त्यामध्ये 25 जणांची टेस्ट केली.यातील 1 व्यक्तीचा अहवाल बाधित आल्याने चिखलेवाडी ग्रामस्थांनी व आरोग्य विभागाने सुटकेचा निःश्वास टाकला .

तळमावले प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.उमेश गोंजारी यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या तपासणी कॅम्प मध्ये डॉ.सुप्रिया यादव तसेच आरोग्य सेविका ए, एम कांबळे, आरोग्य सहाय्यक जामसिंग पावरा व चिखलेवाडी पोलीस पाटील प्रवीण मोरे, अमित शिंदे सहभागी झाले होते. 

यावेळी येथील ग्रामस्थांना मास्क घालने, सतत हात धुणे सॅनिटायझर चा वापर करणे, अशा कोरोना प्रतिबंधक नियमाचे पालन करण्याच्या सूचना वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिल्या.

या वेळी ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना डॉ.सुप्रिया यादव म्हणाल्या ज्या गावात टेस्टिंग कॅम्प घेण्यात येईल त्या ठिकाणी लोकांनी आरोग्य विभागाला सहकार्य करावे. कोरोनाची लक्षणे आढळल्यास तातडीने न भिता कोरोना चाचणी करून घ्यावी व उपचार घ्यावेत. तरच आपण कोरोनाला रोखण्यात यशस्वी होऊ.