दक्षिण मुंबईतील ब्राम्हणवाडी भागात स्ट्रीटलाईट १०५ वॅटच्या दिव्यांची सोय


मुंबई | कृष्णाकाठ वृत्तसेवा : दक्षिण मुंबईचे खासदार अरविंद सावंत,शिवसेना उपनेते, स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव, भायखळा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सौ. यामिनी जाधव यांच्या सूचनेनुसार तसेच शिवसेना मा. नगरसेवक मनोज जामसुतकर यांच्या विशेष प्रयत्नाने ब्राह्मणवाडी येथील पदपथावर असलेल्या स्ट्रीटलाईटवरील ५० वॅट क्षमतेच्या दिव्यांच्या ऐवजी १०५ वॅटच्या दिव्यांची सोय उपलब्ध करून दिली.

त्याबद्दल स्थानिक रहिवाश्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये प्रभाग क्रमांक २१० च्या नगरसेविका सौ. सोनम मनोज जामसुतकर यांच्या शुभहस्ते उदघाटनाचा कार्यक्रम पार पडला. तदप्रसंगी शिवसेना मा. नगरसेवक मनोज जामसुतकर,मा.नगरसेवक सुर्यकांत पाटील,शाखाप्रमुख हेमंत मयेकर,जेष्ठ कार्यकर्ते राजेश सिंग, कल्पेश गायकवाड, स्वाती कोळेकर व अन्य विभागीय कार्यकर्ते तसेच विभागातील नागरिक उपस्थित होते.

Popular posts
ना. शंभूराज देसाई यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या ढेबेवाडी, कुंभारगाव व काढणे विभागातील विविध विकास कामाचे भूमिपूजन संपन्न.
इमेज
'रयत'च्या जनरल बॉडी सदस्यपदी निवड झाल्या बद्दल सारंग पाटील यांचा 'जनसहकार'च्या वतीने सत्कार.
इमेज
आधार फाऊंडेशनच्या वतीने ड्रायव्हर दिन साजरा.
इमेज
राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीवर निवड झाल्याबद्दल खा. श्रीनिवास पाटील यांचा 'जनसहकार' तर्फे सत्कार
इमेज
'उत्तर' कार्याला 'निराधारां'ना भरवला 'मायेचा' घास डाकवे परिवाराने जपले सामाजीक ऋण
इमेज