विकास शिरसठ यांची शिराळा तालुका भाजपा युवा मोर्चा सरचिटणीस पदी निवड.

 

शिराळा | कृष्णाकाठ वृत्तसेवा :

मेणी (शिरसठवाडी) तालुका शिराळा गावचे सुपुत्र सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असणारे व सावंतवाडी ग्रामपंचायतीचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य विकास शिरसठ यांची तालुका भाजपा युवा मोर्चा सरचिटणीसपदी नूकतीच निवड झाली आहे.

माजी मंत्री मा. शिवाजीराव नाईक, युवा नेते सत्यजित (भाऊ) देशमुख यांनी विकास शिरसठ यांची या पदावर नियुक्ती करून तालुक्याच्या सरचिटणीस पदाची जबाबदारी सोपवली आहे. विकास शिरसठ हे युवा नेतृत्व शिराळा तालुक्यात सर्वत्र परिचित आहे. शिराळा तालुका कुस्ती मल्लविद्या महासंघाचे प्रवक्ते म्हणूनही ते काम करत आहेत. कुस्तीवर प्रेम करणारा, तालुक्यात कुस्ती मल्लांना प्रोत्साहन मिळावे यासाठी सतत प्रयत्नशील असणारे युवा व्यक्तिमत्व यांची भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी शिराळा तालुका भाजपा युवा मोर्चा सरचिटणीस पदी निवड करून तालुक्यात काम करण्याची संधी व जबाबदारी दिली आहे. त्यांच्या निवडीमुळे तालुक्यातील भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे‌ व पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. 

या निवडीवर कृष्णाकाठशी बोलताना विकास शिरसठ म्हणाले माजी मंत्री माननीय शिवाजीराव नाईक साहेब आणि युवा नेते सत्यजित (भाऊ) देशमुख यांनी माझ्यावर जबाबदारी दिली आहे त्या जबाबदारीचे, त्या दिलेल्या संधीचे सोने करून दिलेली जबाबदारी मी समर्थपणे पार पाडीन. भाजपा युवा मोर्चाचे कार्य तालुक्‍यात प्रभावीपणे करून भाजपा युवा मोर्चाची ताकद तालुक्यात निश्चितपणे वाढविण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहीन. सर्व कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन काम करीन.

 यावेळी भाजपा वरिष्ठ नेत्यांचे व पदाधिकाऱ्यांचे विकास शिरसठ यांनी दिलेल्या या संधी बद्दल आभार मानले.

Popular posts
ना. शंभूराज देसाई यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या ढेबेवाडी, कुंभारगाव व काढणे विभागातील विविध विकास कामाचे भूमिपूजन संपन्न.
इमेज
'रयत'च्या जनरल बॉडी सदस्यपदी निवड झाल्या बद्दल सारंग पाटील यांचा 'जनसहकार'च्या वतीने सत्कार.
इमेज
आधार फाऊंडेशनच्या वतीने ड्रायव्हर दिन साजरा.
इमेज
राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीवर निवड झाल्याबद्दल खा. श्रीनिवास पाटील यांचा 'जनसहकार' तर्फे सत्कार
इमेज
'उत्तर' कार्याला 'निराधारां'ना भरवला 'मायेचा' घास डाकवे परिवाराने जपले सामाजीक ऋण
इमेज