ग्रामीण भागात लसीकरण केंद्रावर पुरेसा साठा उपलब्ध करावा : पै.तानाजी चवरे.

उंडाळे|कृष्णाकाठ वृत्तसेवा : कराड तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. बाधितांवर हॉस्पिटल मध्ये, कोरोना केअर सेंटर मध्ये उपचार सुरु आहेत.

आज सर्वत्र शासनातर्फे लसीकरण केले जाते. शासनाने हा उपक्रम प्राधान्याने राबविण्याचे ठरविले आहे. परंतु लसीचा तुटवडा व ज्या लसी आपल्या जिल्ह्यात व तालुक्यात उपलब्ध होतात त्याचे तालुक्यातील प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्राला योग्य वाटप झाले पाहिजे जेणेकरून उपलब्ध लसीमध्ये लसीकरण उपक्रम राबविता येईल. अशी मागणी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण (बाबा) यांच्याकडे कराड दक्षिण काँग्रेस चे प्रवक्ते पै तानाजी चवरे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

याविषयीं कराड दक्षिण काँग्रेसचे प्रवक्ते पै तानाजी चवरे म्हणाले की, कराड दक्षिणचे आमदार तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी नुकतेच उंडाळे येथे ग्रामीण रुग्णालयात कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी 30 बेडचे कोरोना सेंटरचे लोकार्पण केले व त्याचसोबत उंडाळे ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन प्लांट उभारण्यासाठी 30 लाख रुपये आमदार निधीतून दिले जाईल अशी घोषणा केली. विकासाची दृष्टी असणाऱ्या पृथ्वीराज बाबांना मी निवेदनद्वारे विनंती केली आहे की, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावापासून जनतेला प्रतिबंधित करण्यासाठी लसीकरण मोठ्या प्रमाणात झाले पाहिजे. उंडाळे, ओंड, सवादे, साळशिरंबे, घोगाव, येणपे आदी गावांसाठी लसीकरण उंडाळे ग्रामीण रुग्णालयात राबविले जाते. परंतु येथे लसीचा तुटवडा दिसून येतो तसेच गावनिहाय वाटप होत नाही यासाठी उपलब्ध लसीचे गावनिहाय योग्य वाटप व्हावे जेणेकरून लसीकरण उत्तम प्रकारे राबविता येईल. प्रत्येक लसीकरण केंद्रावर पुरेसा साठा उपलब्ध व्हावा जेणेकरून सर्व लोकांना वेळेवर लस मिळेल . व व जनतेचा त्रास कमी होईल व कोरोना सारख्या महाभयंकर रोगांपासून त्यांचा बचाव होईल. याकरिता आपण स्वतः लक्ष घालून शासनाकडे पाठपुरावा करावा अशी विनंती निवेदनाद्वारे आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे केली आहे.

Popular posts
ना. शंभूराज देसाई यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या ढेबेवाडी, कुंभारगाव व काढणे विभागातील विविध विकास कामाचे भूमिपूजन संपन्न.
इमेज
'रयत'च्या जनरल बॉडी सदस्यपदी निवड झाल्या बद्दल सारंग पाटील यांचा 'जनसहकार'च्या वतीने सत्कार.
इमेज
आधार फाऊंडेशनच्या वतीने ड्रायव्हर दिन साजरा.
इमेज
राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीवर निवड झाल्याबद्दल खा. श्रीनिवास पाटील यांचा 'जनसहकार' तर्फे सत्कार
इमेज
'उत्तर' कार्याला 'निराधारां'ना भरवला 'मायेचा' घास डाकवे परिवाराने जपले सामाजीक ऋण
इमेज