प्रधानमंत्री आत्मनिर्भर अभियानाच्या राज्य महासचिवपदी अनिल कचरे यांची निवड.

 


कराड | कृष्णाकाठ वृत्तसेवा :

प्रधानमंत्री आत्मनिर्भर भारत अभियान संगठनच्या महाराष्ट्र राज्याच्या महासचिवपदी येथील अनिल कचरे यांची निवड झाली. त्यांच्या पदाचे नियुक्तीपत्र नुकतेच मिळाले आहे. निवडीबद्दल त्याचे सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे. कचरे हे अपंग कल्याण मंडळ, पंतप्रधान जनकल्याण योजना अशा पदावर ते कार्यरत आहेत.

अभियानचे राष्ट्रीय अध्यक्ष मुकेश शर्मा, राष्ट्रीय महामंत्री भगवान बागुल, राष्ट्रीय उपाध्यक्ष शिवाजीराव देवकर, राष्ट्रीय उपाध्यक्ष रामकुमार पाल, महाराष्ट्र राज्य महिला प्रदेशाध्यक्षा सुलोचना चौधरी, महिला महासचिव सुनिता जानवेकर, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष मुंकुद पन्हाळे, महिला अध्यक्षा दिपाली गोडसे, भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे प्रदेश सरचिटणीस डॉ.अतुल भासले, जगदंबा उद्योग समूहाचे बाळासाहेब खबाले, कराडचे नगरसवेक हणमंतराव पवार, युवानेते विजयसिंह यादव, विंग ग्रामपंचायत उपसरपंच सचिन पाचुपते, सदस्य यांनी निवडीबद्दल अभिनंदन केले.

 विविध योजना अभियानच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचवण्याचे काम पदाच्या माध्यमातून करणार असल्याचे निवडीनंतर अनिल कचरे यांनी सांगितले.