घाटले गावातील गणेश तलावाचे साफसफाई व सौंदर्यीकरण होणार

 

मुंबई | कृष्णाकाठ वृत्तसेवा : चेंबूरच्या घाटले गाव परिसरातील प्रसिद्ध गणेश तलावाच्या लोखंडी संरक्षण जाळी वादळ वाऱ्यामुळे जमीनदोस्त झाल्या आहेत. या घटनेची माहिती कळताच बेस्टचे माजी अध्यक्ष आणि स्थानिक नगरसेवक अनिल पाटणकर यांनी स्वतः पुढाकार घेत या तलावाची साफसफाई व सौंदर्यीकरण करण्याच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात केली.

नगरसेवक अनिल पाटणकर यांच्या हस्ते नुकताच या गणेश तलावाच्या साफसफाई व सौंदर्यीकरण कामाचा भूमिपूजन कार्यक्रम पार पडला.यावेळी अनिल पाटणकर यांच्यासह भाजपचे ज्येष्ठ पदाधिकारी व या विभागातील मार्गदर्शक जगदीश पराडकर ,शिवसेना शाखाप्रमुख उमेश करकेरा , महिला शाखा संघटिका अनिता महाडिक , लोकप्रिय समाजसेविका मीनाक्षी पाटणकर ,युवासेना शाखा अधिकारी विनय शेट्ये आणि घाटले ग्राम आगरी समाज ट्रस्टचे पदाधिकारी व शिवसैनिक आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते.

Popular posts
तळमावले येथील वाल्मिकी विद्यामंदिरात २५ वर्षानंतर भरला पुन्हा दहावीचा वर्ग
इमेज
कुंभारगांव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील चिमुरड्यांनी भरवला बाजार
इमेज
येळगाव येथे मोफत त्वचा रोग निदान व औषधोपचार शिबीर संपन्न.
इमेज
जनविकास पतसंस्थेच्या आगाशिवनगर शाखेचा चौथा वर्धापन दिन उत्साहात साजरा.
इमेज
माथाडी कामगारांचे अस्तित्व टिकविण्यासाठी नरेंद्र पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा : गुलाबराव जगताप
इमेज