पाटण तालुक्यातील "या" गावात चारित्र्याच्या संशयावरून एका युवकाचा खून ; पोलिसांनी दोन आरोपी केले गजाआड.

 


ढेबेवाडी | कृष्णाकाठ वृत्तसेवा :

          मत्रेवाडी ता.पाटण गावच्या हद्दीत अविनाश कोळेकर याची एका महिलेशी जवळीकता होती, यामुळे चारित्र्याच्या संशयावरून राग मनात धरून त्या महिलेच्या पतीने व दिराने मारहाण व गळा आवळून अविनाश याचा खून केला असून ढेबेवाडी पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे. आरोपींना पाटण येथिल न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे

         याबाबत ढेबेवाडी पोलिसांनी सहाय्यक फौजदार शिवाजी अंकुशी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दिलेली माहिती अशी अविनाश शंकर कोळेकर वय 20 वर्षे रा.कोळेकरवाडी ता.पाटण सध्या रा.मत्रेवाडी याचे काही दिवसांपासून एका 35 वर्षीय महिलेशी जवळीकता आहे असा चारित्र्याचा संशयावरून 2 मे रोजी दुपारी 3 वाजणेच्या सुमारास मत्रेवाडी गावच्या हद्दीत भांगा नावाच्या शिवारात यशवंत मत्रे यांच्या शेतातील आबांच्या झाडाखाली मयत अविनाश व संबंधित महिला गप्पा मारत बसलेला असताना महिलेचा पती व दीर दोघेजण तिथे येवून रागाच्या भरात लाथा बुक्क्यानी मारहाण केली व अविनाश याचा गळा आवळून खून केला आहे 

     ही घटना दुसऱ्या दिवशी म्हणजे 3 मे रोजी कळून आली होती यानुसार मयत म्हणून पोलिस ठाण्यात घटनेची नोंद झाली होती. मयताचे उपजिल्हा रुग्णालय येथे शवविच्छेदन केले असता गळा आवळून मृत्यू झाला असल्याचे रिपोर्ट आले आहेत असे सांगण्यात आले घटनास्थळी पंचनामा केला असता पायातील सँडल, एक मोबाईल, टॉवेल, तुटलेले बटन,महिलेचा केसात वापरण्याचा बो असे साहित्य मिळून आले होते यानुसार ढेबेवाडी पोलिसांनी कसून चौकशी करून घडलेली घटनेचा छडा लावला व अविनाश कोळेकर याचा खून झाला असून दोन्ही आरोपीना अटक केली आहे. आज 4 मे रोजी त्यांना पाटण येथे न्यायालयात हजर केले असता चार दिवस पोलीस कोठडी देण्यात आली आहे. सदर घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी रणजित पाटील यांनी भेट दिली. या घटनेचा तपास ढेबेवाडी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष पवार करत आहेत.