भेदा चौक ते कार्वे नाका दरम्यान सुरू असलेल्या डांबरीकरण कामाची खा.श्रीनिवास पाटील यांनी केली पहाणी.

या कामासाठी खा.श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नातून सुमारे 1 कोटी 20 लाख रूपयाचा निधी मंजूर


कराड | कृष्णाकाठ वृत्तसेवा :

    कराड येथील भेदा चौक ते कार्वे नाका दरम्यान सुरू असलेल्या डांबरीकरण कामाची पहाणी खा.श्रीनिवास पाटील यांनी केली. त्यांच्या प्रयत्नातून या कामासाठी निधी मंजूर झाला असल्याने स्थानिक नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.

    कराड ते तासगाव राष्ट्रीय महामार्ग 266 वरील भेदा चौक ते कार्वे नाका दरम्यान रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम सध्या सुरू आहे. या डांबरीकरण कामाची पहाणी खा.श्रीनिवास पाटील यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन केली. गुरूवारी या ठिकाणी भेट देऊन या कामासंदर्भात स्थानिक नागरिकांशी संवाद देखील साधला. या कामासाठी खा.श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नातून सुमारे 1 कोटी 20 लाख रूपयाचा निधी मंजूर झाला आहे. सदर रस्त्याची दुरावस्था झाल्याने रस्ता दुरूस्तीची मागणी स्थानिक नागरिकांनी त्यांच्याकडे केली होती. याबाबत खा.श्रीनिवास पाटील यांनी कोल्हापूर येथील राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांना वेळोवेळी पत्रव्यवहार व पाठपुरावा करून सदर रस्त्याच्या सुधारणे संदर्भात सूचना केली होती. त्यानुसार हा निधी मंजूर झाला असून हे काम प्रगतीपथावर आहे. दरम्यान कराड शहरातून जाणा-या या मार्गाच्या दुरूस्तीचे काम पूर्णत्वास जात असल्याने स्थानिक नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.

    यावेळी कराड नगरपरिषदचे विरोधी पक्ष नेते सौरभ पाटील, सारंग पाटील, शिवाजी पवार, जयंत बेडेकर, नंदकुमार बटाणे, वैभव हिंगमिरे ,सतीश भोंगाळे, अनिल जोशी मिस्त्री, सुरेश रैनाक, महेश कदम, ग्रामपंचायत सदस्य, जब्बार पटेल, अमित शिंदे, दीपक पाटील, पैगंबर इनामदार आदी उपस्थित होते.

Popular posts
पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या नावे फिरणारी ती पोस्ट चुकीची व खोटी
इमेज
साताऱ्यात राष्ट्रवादीला सुरुंग, राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांचे भाऊ शिवसेनेत दाखल.
इमेज
पाटण बाजार समितीच्या सभापतीपदी बाळकृष्ण पाटील तर उपसभापतीपदी विलास गोंडांबे यांची निवड.
इमेज
मान्याचीवाडी गावाने पटकावला पन्नास लाख रुपयांचा माझी वसुंधरा अभियान राज्यस्तरीय पुरस्कार.
इमेज
कुंभारगाव ग्रामपंचायती तर्फे पुण्य श्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराचे वितरण.
इमेज