कुंभारगाव विभागात महावितरण च्या डिपी चोरांचा सुळसुळाट.

 


कुंभारगाव | कृष्णाकाठ वृत्तसेवा :

कुंभारगाव ता पाटण विभागात महावितरण च्या डिपी चोरांचा सुळसुळाट झाला आहे. यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. या डीपी चोरांचा ढेबेवाडी पोलिसांनी तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

कुंभारगाव पासून जवळच कळंत्रेवाडी येथील विकास मारुती सावंत यांनी आपल्या धबदबी नावाच्या शेतात महावितरण कडून वीज कनेक्शन घेतले होते, त्या साठी महावितरण कडून त्यांना डिपी कनेक्शन दिले होते. काल सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास विकास सावंत यांचे बंधू निवास सावंत शेतात गेले असता त्यांना विद्युत खांबावरील डिपी खाली पडलेली दिसली डीपीचे सर्व नट बोल्ट खोलण्यात आले होते, डीपीतील सर्व ऑइल जमिनीवर पडले होते. डीपीचे लायटिंग अरेस्टर, बुशिंग विस्कटलेल्या अवस्थेत दिसून आले. चोरटयांनी डिपी पूर्ण फोडण्याचा प्रयत्न केला त्याचबरोबर शेजारीच असणाऱ्या विहिरीतील मोटारीची केबल कट करून त्यातील तांब्याची तार काढलेली दिसून येत होती.

सध्या डीपी चोरीचे प्रमाण या विभागात वाढलेले दिसून येत आहे त्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. ढेबेवाडी पोलिसांनी या डीपी चोरांचा शोध घेऊन त्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी विभागातील शेतकरी वर्गातून होत आहे.

या डीपी चोरीची फिर्याद येथील वायरमन दिलीप घोलप यांनी ढेबेवाडी पोलिसात दिली असून ढेबेवाडी पोलीस स्टेशनचे घाडगे अधिक तपास करत आहेत. .

Popular posts
गुढे वि. का स. सेवा सोसायटी निवडणुकीत शिवसेनेचा 13 - 0 ने मोठा विजय. राष्ट्रवादीच्या पॅनेलचा दारुण पराभव. 20 वर्षांनंतर सत्तातर .
इमेज
बनपुरी सोसायटीत शिवसेना पुरस्कृत स्व. रघुनाथ महादेव पाटील शेतकरी विकास पॅनेलचा 13-0 ने दणदणीत विजय
इमेज
सारंग पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त शाळेतील मुलांना संजीवन प्रतिष्ठान व नवभारत पतसंस्थेच्या वतीने सामाजिक बांधिलकी ,
इमेज
सारंग पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जनसहकार पतसंस्थेच्या वतीने जिजाऊ वस्तीगृहातील मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप
इमेज
काळगाव सोसायटीत विजय तरुणाईचा..
इमेज