मुंबई | कृष्णाकाठ वृत्तसेवा : राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या काही प्रमाणात खाली आली आहे. पण आपण अद्यापही कोरोनाच्या नव्या विषाणूवर ताबा मिळवू शकलेलो नाही. अशा परिस्थितीत तिसरी लाट आली तर सर्व कठीण होऊन बसेल. आपण रुग्णालये, बेड्स, ऑक्सिजन सर्व व्यवस्था उभी करण्याता प्रयत्न करु. पण तरीही कोरोनाचा नवा म्युटेट आणि तिसरी लाटचा सामना करणं कठीण होईल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी रविवारी रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला.
तौत्के वादळ स्पर्शून गेलं, बाधितांना नुकसान भरपाई दिली जाईल
महाराष्ट्र दिनानंतर आज पहिल्यांदा भेटतोय. एक महिन्यात आपण नेमके कुठे आहोत, पुढे काय करायला हवं याची माहिती देणं गरजेचं आहे, मी सर्वांना धन्यवाद देतो. कारण वर्ष-दीडवर्ष आपण निर्बंध पाळत आहात. तौत्के हे सगळ्यात भीषण वादळ होतं. हे वादळ गुजरातला धडकलं. हे वादळं दरवर्षी आदळत आहेत. याविरोधात सामना करताना तारांबळ उडते. संपूर्ण किनारपट्टीहून लोकांना हलवणं, ते हलवताना कोविडचे नियम पाळणं हे खूप विचित्र असतं, आपण थोडक्यात निभावलं. हे वादळ आपल्याला स्पर्शून गेलं. मी धावता दौरा केला.
सध्या आपण पहिल्या लाटेतील सर्वोच्च रुग्णसंख्येच्या बरोबरीने
सध्या कोरोना रुग्ण कमी होत आहेत. त्यामुले निर्बंध उठवण्यात येतील का असा प्रश्न उभा राहतोय. सध्या रुग्णसंख्या ही मागील लाटेच्या सर्वोच्च शिखराएवढी आहे. म्हणजे रुग्णांचा उच्चांक आहे त्याची तुलनात्मक माहिती देणारच आहे. साधारण 17 ते 19 सप्टेंबर 2020 च्या सुमारास आपल्या राज्यात 24 हजार 886 रुग्ण एका दिवसात सापडत होती. आता 26 मे रोजी बघायचं झालं तर साधा 24 हजार 752 रुग्ण आढळले आहेत. म्हणजेच म्हणावे तेवढे रुग्ण कमी झालेले नाहीतेय. पहिल्या लाटेच्या उच्चांकात सक्रिय रुग्ण साधारण 3 लाख 1752 होते. आज 26 मे ला तीन लाख 1542 आहेत. म्हणजे मागील लाटेच्या उच्चांकाच्या आपण आज बरोबरीला आहोत. एक मात्र दिलासादायक बाब म्हणजे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण त्यावेळी 78 टक्के होते. आता यावेळा या दिवसांमध्ये प्रमाण 92 टक्के आहे. मृत्यूदरसुद्धा गेल्या वेळेला 2.65 टक्के होता यावेळा तो 1.62 टक्के आहे.
फॅमिली डॉक्टरने कोविड आणि नॉन कोविड रुग्ण ओळखावं, रुग्णांची योग्य काळजी घ्यावी.
पावसाळ्यात साथीचे आजार आहेत. त्यात कोरोना आहे. त्यामुळे कोरोना रुग्ण ओळखणं अवघड आहे. अशावेळी आपण आप्लाय फॅमिली डॉक्टरकडे जातो. 70 टक्के रुग्णांना कोरोनाची लक्षणे नसतात. पण ते घाबरुन हॉस्पिटलमध्ये जातात. त्यामुळे गरज असलेल्यांना बेड्स मिळत नाहीत. त्यामुळे आपण त्यांना विनंती करतो. हॉस्पिटलमध्ये राहण्याची गरज नाही, अशी विनंती करतो. मृत्यूदर वाढतोय. त्यामागे कारण म्हणजे रुग्ण घरच्याघरी जास्त सिरिअस होतात. त्यामुळे त्यांना वाचवणं अवघड होतं. अशावेळी फॅमिली डॉक्टरची जबाबदारी वाढते. फॅमिली डॉक्टरने कोविड आणि नॉन कोविड रुग्ण ओळखावं. बाधित असल्यास त्याला विलगीकरणात ठेवण्याचा सल्ला द्यावा. फॅमिली डॉक्टरने चांगला प्रतिसाद दिला आहे.
आपण अद्याप नव्या कोरोना विषाणूवर ताबा आणू शकलेलो नाही. त्यात तिसरी लाट आली तर अवघड होईल .
ऑक्सिजनसाठी खूप तारांबळ उडाली. बाहेरच्या राज्याहून ऑक्सिजन आणावे लागत होते. ही संपूर्ण यातायात कशी निभावून नेली ते प्रशासनाचं कौतुक करावं लागलं. हे सगळं फार तारेवरची कसरत होती. आता जो अवतार बदललेला विषाणू आहे त्याच्यावर आपण ताबा आणलेलं नाही. हा विषाणू आता सुटला आणि तिसरी लाट आली तर आपल्याला फार कठीण जाईल. त्यामुळे फार काळजी घ्यावं लागणार आहे. हे कमी होतं की काय आता काळी बुरशी आलेली आहे. राज्यात म्युकोरमायकोसीसचे तीन हजार रुग्ण आहेत. या विरोधात लढण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेत आहोत.
लोकांवर निर्बंध लादणे हे सर्वात वाईट, पण सर्वांच्या सुरक्षेसाठी करावं लागतं
राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांना आतापर्यंत तीन हजार 865 कोटींचा निधी उपलब्ध करुन दिलेला आहे. आपला महाराष्ट्र सुरक्षित राहावा म्हणून हे सगळं काही करण्यात येत आहे. लोकांवर निर्बंध लादणे हे सर्वात वाईट आहे. जी जनता आपल्यावर प्रेम करते त्यांच्यावर निर्बंध लादणे हे कटू काम आहे. पण सर्वांच्या सुरक्षेसाठी निर्बंध लावावे लागत आहेत.
‘तिसरी लाट आपल्या वागणुकीवर अवलंबून, नवा विषाणू जास्त घातक’
तिसरी लाट आपल्या वागणुकीवर अवलंबून आहे. आताचा जो विषाणू आहे तो झपाट्याने वाढतो आहे. तो झपाट्याने पसरतोय. रुग्णाला बरं व्हायला उशिर लागतोय. ऑक्सिजनची आवश्यकता वाढली. काही जणांना ऑक्सिजनची गरज जास्त लागली. ही वस्तूस्थितीत आहे.
निर्बंध अद्याप हटवणार नाहीत, मुख्यमंत्र्यांचे संकेत
कोरोना काळात धान्य वाटप केलं. 55 लाख शिवभोजन थाळ्या मोफत दिल्या. फेरीवाल्यांसाठी निधी दिला. आपला महाराष्ट्र सुरक्षित राहण्यासाठी काम करत आहोत. काही निर्बंध लादावे लागतात. त्यापेक्षा वाईट काम नाही. जी जनता आपल्याला आपलं मानते त्यांच्यावर बंधनं लादणं यापेक्षा कटू काम कोणतंही असू शकत नाही. कोरोना लाट खाली यायला लागली आहेत. त्यामुळे निर्बंध काढणार का? असं काही लोक विचारत आहोत. आपली आजची परिस्थिती थोडीशी कमी झाली आहे. पण आजची जी मृतसंख्या ही गेल्या लाटेतील सर्वाधिक रुग्णसंख्याच्या बरोबरीचं आहे. गेल्यावेळीची लाट ही सणासुदीनंतर आली होती. अजूनही आपण म्हणावं तेवढं खाली आलोलो नाही. रुग्णसंख्या कमी होत आली असली तरी गेल्यावेळीची सर्वोच्च रुग्णसंख्येच्या बरोबरीची संख्या आहे. रुग्णसंख्या कमी असली तरी महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात रुग्णसंख्या हल्कीशी वाढताना दिसत आहे. ग्रामीण भागात हे प्रमाण वाढताना दिसत आहे. हे प्रमाण आपल्याला थांबवायला हवं.
राज्यात ऑक्सिजन निर्मितीची क्षमता 1200 मेट्रिक टन, ते दिवस आठवले की आजही घाम फुटतो.
सध्या कोरोना चाचण्या करणाऱ्या प्रयोगशाळांमध्ये वाढ करण्यात आली आहे. ऑक्सिजन बेड्स, व्हेंटिलेटर बेड्स वाढवलेले आहेत. सध्या अजूनही आपल्याला ऑक्सिजनची गरज भासते. ते दिवस आठवून आजही मला घाम फुटतो. ऑक्सिजन काही तासांपुरताच राहायचा, असे फोन यायचे तेव्हा काय करायचं हा प्रश्न व्यवस्थेपुढे उभा राहायचा. आपल्या राज्यात ऑक्सिजन निर्मितीची क्षमता 1200 मेट्रिक टन आहे. मात्र या लाटेत आपल्याला दिवसाला 1700 मेट्रिक टन ऑक्सिजन लागला.
तिसरी लाट तारीख सांगून येणार नाही, किती दिवसांनी येणार हेही आपण सांगू शकत नाही .
आता आपण निर्बंध लावतो आहोत. सध्या कडक लॉकडाऊन केलेला नाही. काही ठिकाणी रुग्णसंख्या कमी होत असली तरी महाराष्ट्रात काही जिल्ह्यांत रुग्णसंख्या हलकीशी वाढत आहे. शहरी भागात कोरोनाचे प्रमाण कमी होत आहे. तर ग्रामीण भागात हे प्रमाण वाढत आहे. ते कमी करणे गरजेचे आहे. आपण अनुमान लावतो आहोत की तिसरी लाट येऊ शकते. तिसरी लाट तारीख सांगून येणार नाही. ती किती दिवसांनी येणार हेही आपण सांगू शकत नाही. आजही व्हायरल आपल्यात आहे. मागील लाटेतील व्हायरस आणि या लाटेतील व्हायरस यामध्ये फरक आहे. आपल्याला सर्वांना कल्पना आहे की या व्हायरसमध्ये म्युटेशन्स आहेत. हा व्हायरस वेगाने पसरत आहे. तो वेगाने पसरतो आहे. हा विषाणू कित्येक पटीने लोकांना झपाट्याने ग्रासतोय. रुग्णाला बरे होण्यासाठी वेळही लागतो आहे.