मुंबईतील शिवसेनेच्या दोन आमदारांना चर्मकार संघाने दिली आक्रोश निवेदने


मुंबई | कृष्णाकाठ वृत्तसेवा : आरक्षण हक्क कृती समितीने ठरविल्याप्रमाणे आयबीसेफ, चर्मकार विकास संघ, कास्ट्राईब राज्य परिवहन कर्मचारी संघटना, म्हाडा मागासवर्गीय कर्मचारी संघटना यांच्यावतीने शिवसेनेचे आमदार प्रकाश फातर्पेकर यांना आणि आमदार मंगेश कुडाळकर यांना आक्रोश निवेदन देण्यात आले.

यावेळी दोघाही आमदारांनी ताबडतोब मुख्यमंत्री महोदय यांना मागासवर्गीयांचे पदोन्नतीतील ३३ टक्के आरक्षण बंद केलेला शासन निर्णय रद्द करून पदोन्नती सुरू करण्याबाबत पत्र देऊन आणि त्यांच्याशी प्रत्यक्ष बोलणार असल्याचे सांगितले.तसेच राज्य घटनेने व कायद्याने दिलेले हक्क, अधिकाराच्या अंमलबजावणीसाठी आम्ही मागासवर्गीयांच्या पाठीशी आहोत असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला .यावेळी प्रामुख्याने सुनिल निरभवने, एस के भंडारे, सुभाष मराठे, प्रियंका गजरे ,राजेश साबळे, अच्युताई तीग्या, राजू थोरात ,आशुतोष ढवळे ,अविनाश सातपुते इत्यादी मोठ्या संख्येने उपस्थित होत.

Popular posts
कुंभारगांव येथील संदीप देवळेकर यांचे दुःखद निधन .
इमेज
चंद्रकांत चाळके यांची बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाच्या ऐरोली विधानसभा विभाग प्रमुख पदी निवड.
इमेज
गडकोट व किल्ले संवर्धनासाठी दुर्ग प्राधिकरणाची स्थापना करणार - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
इमेज
न्यू इंग्लिश स्कूल गोकूळ-धावडे या विदयालयामध्ये तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेचे आयोजन.
मान्याचीवाडी ग्रामपंचायतीची संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत राज्यस्तरीय समितीने केली पाहणी.
इमेज