राष्ट्रवादी काँग्रेस चेंबूर तालुका कोरोना योद्धा मदत समिती स्थापन

 


मुंबई | कृष्णाकाठ वृत्तसेवा : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस रवींद्र पवार तसेच जिल्हा अध्यक्ष रमेश परब ,जिल्हा निरीक्षक महेंद्र पानसरे व चेंबूर तालुका निरीक्षक प्रभाकर पोळेकर ह्यांच्या मार्गदर्शनाखाली चेंबूर तालुका अध्यक्ष दीपक सावंत यांनी सध्याच्या कोरोना महामारीच्या काळात प्रत्येक गरजू नागरिकांना विविध प्रकारची तत्काळ सेवा उपलब्ध करून देण्यासाठी कोरोना योद्धा मदत समिती स्थापन करण्याचा स्तुत्य उपक्रम राबविला आहे.

या कोरोना मदत समितीच्या माध्यमातून कुणालाही रुग्णवाहिका , रुग्णालय , रुग्णालय मदत , वृध्द व्यक्तीस औषधांचा पुरवठा , रेशनिंग समस्या , महापालिकातर्फे औषध फवारणी आणि रक्त पुरवठा यासारख्या समस्यांचे निराकरण केले जाणार आहे. या समितीमध्ये ५० पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा समावेश करण्यात आला आहे. तरी गरजूंनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खरदेवनगर ,किसन कांबळे भाजी मार्केट येथील पक्ष कार्यालयात अधिक चौकशीसाठी संपर्क साधण्याचे आवाहन दीपक सावंत यांनी केले आहे.