चेंबूरच्या घाटले गाव परिसरात नगरसेवक पाटणकरांची नालेसफाई मोहीम

 


मुंबई | कृष्णाकाठ वृत्तसेवा : चेंबूरच्या वॉर्ड क्रमांक १५३ मधील घाटले गाव परिसरातील सर्व वाड्या , सोसायट्या आणि पालिका वसाहतीमध्ये स्थानिक लोकप्रिय नगरसेवक अनिल पाटणकर यांनी गेल्या काही दिवसांपासून नाले ,गटार साफसफाई मोहीम व औषध फवारणी राबविण्याचे काम पालिकेच्या माध्यमातून सुरू केले आहे.

कोरोना संसर्ग काळात नागरिकांचे आरोग्य सुरक्षित राहावे ,त्यांना कोणतेही आजार होऊ नये म्हणू आपला स्वच्छ ठेवण्याचे काम नगरसेवक अनिल पाटणकर यांच्या सूचनेनुसार महापालिका करत आहे.नुकतीच नगरसेवक अनिल पाटणकर यांनी एम वॉर्ड पालिका अधिकारी प्रथमेश जाधव यांच्या समवेत ना.ग.आचार्य मार्ग व केळकरवाडी मार्ग येथिल गटार साफसफाई कामाची पाहणी केली.