फुड अँण्ड ड्रग्ज कंन्झ्युमर वेल्फेअरचे कार्य प्रेरणादायी:स.पो.नि.संतोष पवार.

 


तळमावले कृष्णाकाठ वृत्तसेवा :

ढेबेवाडी ता.पाटण येथील फुड अँण्ड ड्रग्ज कंन्झ्युमर वेल्फेअरने नेहमी सामाजिक बांधीलकी जपली असून सामाजिक क्षेत्रातही फुड अँण्ड ड्रग्ज कंन्झ्युमर वेल्फेअरचे कार्य प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन ढेबेवाडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संतोष पवार यांनी येथे बोलताना केले.
फुड अँण्ड ड्रग्ज कंन्झ्युमर वेल्फेअर यांच्या वतीने मास्क व सॅनिटायझरच्या वाटपप्रसंगी ते बोलत होते.

फुड अँण्ड ड्रग्जकंन्झ्युमर वेल्फेअरच्या वतीने ढेबेवाडी पोलीस ठाणे,कराड ग्रामीण पोलीस ठाणे येथे कोरोना प्रतिबंधक यंत्रणेमध्ये काम करणाऱ्या पोलीस दलासह फ्रंटलाईन वर्कर्स यांना मास्क व सॅनिटायझरचे वाटप केले.
कराड ग्रामीण चे पोलीस निरीक्षक श्री.बाळासाहेब भरणे व ढेबेवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री संतोष पवार यांनी या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले. 

यावेळी माणिक खटावकर , प्रकाश मोरे ( अध्यक्ष फुड अँण्ड ड्रग्ज पाटण तालुका ) , प्रा.सचिन पुजारी, मानंतोष जंगाणी, राजेंद्र पुजारी (दै.कृष्णाकाठ प्रतिनिधी ), संजय भुलूगडे, दुधडे (प्रेस फोटोग्राफर ) तसेच पोलीस कर्मचारी व होमगार्ड उपस्थित होते.

Popular posts
पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या नावे फिरणारी ती पोस्ट चुकीची व खोटी
इमेज
साताऱ्यात राष्ट्रवादीला सुरुंग, राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांचे भाऊ शिवसेनेत दाखल.
इमेज
पाटण बाजार समितीच्या सभापतीपदी बाळकृष्ण पाटील तर उपसभापतीपदी विलास गोंडांबे यांची निवड.
इमेज
मान्याचीवाडी गावाने पटकावला पन्नास लाख रुपयांचा माझी वसुंधरा अभियान राज्यस्तरीय पुरस्कार.
इमेज
कुंभारगाव ग्रामपंचायती तर्फे पुण्य श्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराचे वितरण.
इमेज