डाॅ.संदीप डाकवे यांना आदर्श पत्रकार पुरस्कार प्रदान


तळमावले|वार्ताहर : 

पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील पत्रकार डाॅ.संदीप डाकवे यांना मिशन आॅलिम्पिक गेम्स असोसिएशनच्या वतीने आदर्श पत्रकार पुरस्कार 2021 ने गौरवण्यात आले. जागतिक पत्रकारिता स्वातंत्र दिनाचे औचित्य साधून हा पुरस्कार देण्यात आला. कोरोना संसर्गामुळे हा पुरस्कार सोहळा दृश्य प्रणालीव्दारे पार पडला. सदर पुरस्कार मुख्याधिकारी विनोद शिंदे, मिशन आॅलिम्पिक गेम्स असोसिाएशनचे अध्यक्ष व आशियाई सुवर्णपदक विजेते प्रा.पै.अमोल साठे, सचिव पै.अभिजित तापेकर यांनी हा पुरस्कार डाॅ.संदीप डाकवे यांना प्रदान केला.

मिशन आॅल्मिपिक गेम्स असोसिएशनच्या वतीने समाजामध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तिंचा गौरव केला जातो. पत्रकार डाॅ.संदीप डाकवे यांनी पत्रकारिता आणि स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट च्या माध्यमातून केलेल्या कार्याचा गौरव म्हणून त्यांची आदर्श पत्रकार पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती.

यापूर्वी डाॅ.संदीप डाकवे यांना महाराष्ट्र राज्य शासनाकडून उत्कृष्ट पत्रकारितेबद्दल 4 पुरस्कारांनी गौरवले आहे तर विविध सामाजिक संस्था यांचेकडून 50 हून अधिक पुरस्कार दिले गेले आहेत.

या पुरस्काराबद्दल पत्रकार डाॅ.संदीप डाकवे यांचे शिवसमर्थ समुहाचे शिल्पकार अॅड.जनार्दन बोत्रे, प्राचार्य डाॅ.यशवंत पाटणे, प्रा.ए.बी.कणसे, बाळासाहेब कचरे, जयंत कदम, एन.बी.परीट, सुरेश जाधव, स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टचे सर्व पदाधिकारी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Popular posts
ना. शंभूराज देसाई यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या ढेबेवाडी, कुंभारगाव व काढणे विभागातील विविध विकास कामाचे भूमिपूजन संपन्न.
इमेज
आधार फाऊंडेशनच्या वतीने ड्रायव्हर दिन साजरा.
इमेज
'रयत'च्या जनरल बॉडी सदस्यपदी निवड झाल्या बद्दल सारंग पाटील यांचा 'जनसहकार'च्या वतीने सत्कार.
इमेज
राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीवर निवड झाल्याबद्दल खा. श्रीनिवास पाटील यांचा 'जनसहकार' तर्फे सत्कार
इमेज
'उत्तर' कार्याला 'निराधारां'ना भरवला 'मायेचा' घास डाकवे परिवाराने जपले सामाजीक ऋण
इमेज