आता रडायचं नाही तर लढायचं लस घेऊन कोरोनाला हरवायचं भारतीय जैन संघटनेचा अभिनव उपक्रम.

 

मुंबई | कृष्णाकाठ वृत्तसेवा : कोरोनाच्या पहिल्या लाटेत धारावी ही कोरोनाचा हॉटस्पॉट म्हणून सर्व जगभर चर्चा झाली होती,परंतु याच धारावीने कोरोना सारख्या आजाराला पळवून लावले होते.त्यावेळी ज्या उपाययोजना राबवल्या होत्या त्याचे सर्व स्तरातून कौतुक झालेच शिवाय 'धारावी पॅटर्न' ची चर्चा झाली.याची दखल जागतिक आरोग्य संघटनेला देखील घ्यावी लागली होती.

    धारावीची लोकसंख्या पाहता येथे कोरोनाच्या पादुर्भावामुळे शिरकाव झाला तर आटोपता घेणे खूप अवघड होईल म्हणून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सुरुवातीपासूनच मुंबई मनपा आणि भारतीय जैन संघटनेने धारावीतील लोकांमध्ये जनजागृती करून प्रत्येक प्रभागात लसीकरण मोहीम त्याचबरोबर वैधकीय मोफत शिबिर आयोजित करून सर्वसामान्य जनतेला कोरोनामुक्त करण्यासाठी त्यावर उपाययोजना करण्यात येत आहेत. कोरोनाच्या संसर्गजन्य रोगामुळे उदभवणारे आजार प्रामुख्याने सर्दी,खोकला,अंगदुखी,घसा खवखवणे,तापाची लक्षणे लक्षात घेऊन ग/उत्तर विभागाच्या आरोग्य विभागाच्या सहाय्याने भारतीय जैन संघटना धारावीतील घराघरात पोहचत आहे.त्यासाठी पथनाट्य, तरुण मुलांची टीम,ध्वनिक्षेपणाच्या माध्यमातून वेगवेगळे संदेश देऊन धारावी कोरोनामुक्त ठेवण्याचे यशस्वी प्रयत्न सुरू आहेत.

    याची दखल मनपाचे अतिरिक्त आयुक्त सुरेश ककांनी, सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर, वैधकीय अधिकारी डॉ.वीरेंद्र मोहिते आणि भारतीय जैन संघटनेचे डॉक्टर, नर्स, त्यांना सहकार्य करणारे इतर सहकारी टीम प्रचंड मेहनत घेत असून आता रडायचं नाही तर लढायचं आणि धारावीतून कोरोनाला हरवायचं असा नारा देत आहेत. जनतेच्या मनातील भीती दूर करून त्यांना लस का घ्यावी हे पथनाट्य मधून समजावत आहेत,लस नोंदणी करून घेत आहेत. त्यांना लसीकरण केंद्रापर्यंत सोडण्याची जबाबदारी देखील भारतीय जैन संघटनेच्या माध्यमातून सुरू आहे.