प्रसिद्ध कॉमेडियन सुनील पालविरुद्ध अंधेरी पोलिसात गुन्हा दाखल

 

मुंबई | कृष्णाकाठ वृत्तसेवा : सध्याच्या कोरोना काळात रुग्णांची दिवस-रात्र सेवा करणार्‍या डॉक्टरांची बदनामी करणारे व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी कॉमेडियन सुनील पालविरुद्ध अंधेरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अभिनेता सुनील पाल यांनी डॉक्टरांविषयी एक व्हिडिओ व्हायरल करून त्यात डॉक्टरांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करत टीका करण्यात आली आहे. 

सुनील पाल यांनी या व्हिडिओमध्ये, "डॉक्टर सैतानाच्या वेषात फिरत आहेत.कोरोनाच्या नावाने डॉक्टरांकडून गरिबांना घाबरविले जात आहे,असे मत मांडण्यात आले आहे . हॉस्पिटलमध्ये बेड, औषध, प्लाझ्मा नाही,त्यांचे मानसिक शोषण केले जात आहे.गरिब रुग्णांचा सायंकाळपर्यंत कसा मृत्यू होईल. याची पुरेपुर काळजी घेतली जात आहे असे वक्तव्य केले होते.याप्रकरणी एका डॉक्टर संघटनेकडून तक्रार केल्याने अंधेरी पोलिसांनी पाल यांच्यावर गुन्हा नोंदविला आहे. दरम्यान,याबाबत सुनील पाल यांनी हे वक्तव्य सर्व डॉक्टरांबद्दल नव्हते,असे स्पष्टीकरण दिले आहे.

Popular posts
गुढे वि. का स. सेवा सोसायटी निवडणुकीत शिवसेनेचा 13 - 0 ने मोठा विजय. राष्ट्रवादीच्या पॅनेलचा दारुण पराभव. 20 वर्षांनंतर सत्तातर .
इमेज
बनपुरी सोसायटीत शिवसेना पुरस्कृत स्व. रघुनाथ महादेव पाटील शेतकरी विकास पॅनेलचा 13-0 ने दणदणीत विजय
इमेज
सारंग पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त शाळेतील मुलांना संजीवन प्रतिष्ठान व नवभारत पतसंस्थेच्या वतीने सामाजिक बांधिलकी ,
इमेज
काळगाव सोसायटीत विजय तरुणाईचा..
इमेज
सारंग पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जनसहकार पतसंस्थेच्या वतीने जिजाऊ वस्तीगृहातील मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप
इमेज