गरजूंना चाईल्ड उन्नती फाउंडेशनचा मदतीचा हात.

मुंबई | कृष्णाकाठ वृत्तसेवा : चाईल्ड उन्नती फाऊंडेशन, मुंबई चेअरमन  दिलीप धडस यांच्या प्रयत्नातून गरीब गरजू कुटूंबियांना जीवनावश्यक वस्तूचे किट वाटप करून  कोरोनाच्या महामारीत झालेलं सामाजिक काम खूप कौतुकास्पद आहे.

चाईल्ड उन्नती फाऊंडेशन तर्फे धारावी, मुंबई, तसेच सातारा जिल्ह्यातील काही खेडेगावमध्ये गरजू कुटुंबियांना अन्न धान्य रेशन वाटप करण्यात आले असून कोरोनाच्या पहिल्या लाटेत ही या संस्थेने अनेक गरजू कुटूंबियांना मदतीचा हात दिला होता. त्याचबरोबर रुग्णालयातील लहान बालकांवरील शस्त्रक्रिया वेळी सुद्धा त्या गरजूंना आर्थिक मदत करत असतात. ही संस्था सातत्याने लोकांना मदत करत असते