CMS सामाजिक संस्थने कोरोनामुळे अडचणीत सापडलेल्या हजारोंना दिला मदतीचा हात.

 कराड| कृष्णाकाठ वृत्तसेवा :

 करोना व्हायरसची दुसरी लाट आल्याने अनेक जण हवालदील झाले आहेत. अनेकांना वेळेवर ऑक्सिजन, बेड मिळत नाही. अनेकांना वेळेवर जेवण मिळत नाही. अशा लोकांच्या मदतीसाठी सोशल मीडिया ग्रुप धावून आले आहेत. सध्या फेसबुक आणि व्हॉट्सअॅपवर अनेक ग्रुप असून ते गरजुनां मदत करीत आहेत.

 अशीच एक सामाजिक संस्था सामाजिक बांधिलकी जपत संकटात अडकलेल्या हजारो लोकांना मदतीचा हात देत आहे.महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यासह संपूर्ण देशात व विदेशात CMS छत्रपती मराठा साम्राज्य ग्रुपच्या माध्यमातून अनोख्या उपक्रमाचा नागरीकांना आधार मिळतोय.

जाती-धर्माच्या भिंती तोडत CMS छत्रपती मराठा साम्राज्य ह्या सामाजिक संस्थने कोरोनामुळे अडचणीत सापडलेल्या हजारोंना मदतीचा हात दिला आहे. 

CMS छत्रपती मराठा साम्राज्य परिवारामध्ये महाराष्टामधील, परराज्यातील तसेच विदेशातील समाजबांधव हे CMS व्हॉटसऍप, CMS फेसबुकद्वारे एकमेकांशी जोडले गेले आहेत. ग्रुपचे मूळ उद्धिष्ट CMS ग्रुपच्या माध्यमातून शिक्षण, नोकरी, व्यवसाय, शेती, गरजूंना मदत करणे असे आहे. 

व्हॉटसअप, फेसबुकवर सक्रीय असणारी "CMS छत्रपती मराठा साम्राज्य' ही संघटना मागील वर्षापर्यंत केवळ मराठा समाजातील तरुणांच्या शिक्षण, नोकरी व व्यवसायांसाठी मदत करण्यापुरती मर्यादीत होती. मात्र मार्च 2020 मध्ये आलेल्या कोरोनाने त्यांना जाती-धर्माच्या भिंती तोडण्यास भाग पाडले. संघटनेने आलेल्या संकटावर मात करण्यासाठी अडचणीत सापडलेल्या कोणत्याही व्यक्तीला तत्काळ मदत करण्यास सुरूवात केली. राज्यात, देशात व परदेशात अडकून पडलेल्या नागरीकांपासून ते त्यांच्या विविध समस्या या तरुणांनी सोडविल्या आहेत.

____________________________________

सी एम एस ग्रुपचे कोरोना काळातील सामाजिक कार्य.

• कोरोनाचे रौद्ररुप सुरू असतानाही माणुसकीचा झरा वाहत राहीला !

• कोरोनाच्या काळामध्ये अडचणीत सापडलेल्या दररोज किमान 30-35 नागरीकांची कधी प्लाझ्मा, रेमडेसिव्हीर, कधी ऑक्‍सीजन बेड, रुग्णवाहिकेपासून ते रक्त पुरवठ्याची गरज तत्काळ पुर्ण केली, तेही CMS व्हॉटसअप अन्‌ फेसबुक ग्रुपद्वारे. 

• CMS ग्रुपच्या माध्यमातून 300 हून अधिक नागरीकांना प्लाझ्मा उपलब्ध करून दिला आहे. रेमडेसिव्हीर, रक्‍त, साधे बेड, ऑक्‍सीजन बेड, व्हेंटीलेटर बेड, रुग्णालये व रुग्णवाहिका या स्वरुपाची मदत वेळेत उपलब्ध करून दिली. वेळप्रसंगी डॉक्‍टर, काही रुग्णालये, रुग्णवाहिका, टेस्टींग लॅब यांच्याशी संपर्क साधून त्यांचे शुल्क कमी करण्यासाठीही आग्रह केल्याने रुग्णांना आणि नातेवाईकांना दिलासा मिळाला आहे.

• कोरोना आजारांवर उपचार करणाऱ्या सरकारी तसेच खासगी हॉस्पिटलची, टेस्ट सेंटर्स, ब्लड बँक, रुग्णवाहिका, इंजेक्शन मिळणाऱ्या फार्मा, अडचण भासल्यास सरकारी हेल्प लाईन नंबर यांची सर्व माहिती त्या त्या जिल्ह्याच्या ग्रुपवर वेळोवेळी प्रसिद्ध केली जाते त्यामुळे गरजूंना मदत मिळण्यास वेळ लागत नाही. 

• तसेच बाहेरगावचे पेशंट असतील तर त्यांच्या नातेवाईकांना राहण्याची तसेच जेवणाची सोय करून देणे.

समाजसेवा करतांना निम्मी टिम "पॉझिटीव्ह'झाली आहे

• नागरीकांना मदत करताना संघटनेचे निम्म्यापेक्षा जास्त तरुण सहकारी कोरोनाबाधीत झाले. तरीही उर्वरीत टिमने व कोरोनाबाधीत झालेल्यांनीही मोठ्या धैर्याने संकटांशी दोन हात करून नागरीकांना आवश्‍यक मदत पोहचविण्याचे काम सुरू ठेवले आहे.

• सोशल मीडियाचा योग्य वापर हा समाजसेवेसाठी कसा केला जाऊ शकतो हे "छत्रपती मराठा साम्राज्य' संस्थने दाखवून दिले आहे. 

• CMS मध्ये जवळ जवळ १ लाखाच्यावर बांधव हे व्हॉट'स ग्रुप द्वारे जोडले गेले आहे आणि फेसबुकवर 30 हजाराच्यावर बांधव जोडले गेले आहे. संपूर्ण महाराष्ट्रमध्ये तसेच महाराष्ट्राबाहेर विदेशात सुद्धा CMS ग्रुपचे जाळे पसरले आहे. व्हॉटस्‌अप, फेसबुकवर सक्रीय असलेल्या "छत्रपती मराठा साम्राज्य' संघटनेची शिस्तबद्ध कार्यपद्धती आहे. नागरिकांना मदतीसाठी प्रत्येक जिल्हा किंवा तालुकास्तरावर 30 ते 40 मेंबर्सची टीम तयार केली आहे. अशा पद्धतीने संबंधीत संघटना शिस्तबद्ध पद्धतीने लोकांच्या मदतीसाठी पुढे येत आहे.

• CMS ग्रुप नॉलेज सिरीजचा आणि LIVE सेशन उपक्रम राबवते.

• CMS डॉक्टर टीम मध्ये जवळ जवळ 500 डॉक्टर्स व्हाट्स ऍप ग्रुपमध्ये ऍड आहेत. ग्रुपवर पोस्ट आल्या नंतर डॉक्टरसुद्धा रुग्णाला फोनवर योग्य सल्ला तसेच मानसिक आधार देतात. 

नॉलेज सिरीजयामध्ये खाली विषय घेतले आहेत .
  • कोरोना संदर्भात जनजागृती    
  • RTPCR, Antigen, CT स्कॅन म्हणजे काय? 
  • कोरोना टेस्टच्या रिपोर्टचा अर्थ काय ? 
  • कोरोना वरील औषध उपचार संदर्भात जनजागृती  
  • प्लाझ्मा दान म्हणजे काय? 
  • आहार विषयी मार्गदर्शन  
  • लस संदर्भात मार्गदर्शन 
  • प्राणायाम सेशन कोविड पेशंटसाठी 
  • रोगप्रतिकारक शक्ती आणि जीवन शैलीशी असेलला संबंध.   

CMS ऍडमिनमध्ये महेश गव्हाणे, जितेंद्र पवार,धनराज भोसले, अभिजित देशमुख, विक्रम भोसले, ओंकार देशमुख, दत्ता शिंदे, नाविन मोरे, आदित्य जगदाळे, नवीनराज पाटील, सुहास झांजे, मछिंद्र मतसागर, पप्पूराज भरकड, सारंग पाटील, सखाहारी तोरणे तसेच प्रत्येक जिल्यातील असंख्य तरुण CMS छत्रपती मराठा साम्राज्य संघटनेच्या माध्यमातून नागरीकांची प्रत्येक अडचण सोडविण्यासाठी धडपड करीत आहे.