रॉयल कारभार ग्रुप रुग्णांची सेवा करून घडवत आहेत माणुसकीचे दर्शन ; स्तुत्य उपक्रम.

 

कराड | कृष्णाकाठ वृत्तसेवा :

सामाजिक बांधिलकीची जाण ठेवून संकटात असणाऱ्या समाजासाठी मदत करण्याच्या उद्देशाने एक संघटना उभी राहिली व या संघटनेच्या माध्यमातून राज्यभर सामाजिक बांधिलकी जोपासत संकटात अडकलेल्या लोकांना संकट समयी योग्य ती मदत करून त्यांना संकटातून बाहेर काढण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याच्या भावनेतून एक सामाजिक ग्रुप उभा राहिला व आज राज्यभर त्याचे कार्य चालू आहे  अशी महाराष्ट्रभर ख्याती झालेल्या रॉयल कारभार ग्रुपने समाजकार्यात वेगळा ठसा उमटवला आहे. 

या ग्रुपने कोरोना सारख्या महामारी च्या संकटमय काळात रुग्ण सेवा करण्याचे व्रत अंगिकारले आहे . कोविड हॉस्पिटल मध्ये ऍडमिट असणाऱ्या रुग्णांना व रुग्णांच्या नातेवाइकांना जेवण देण्याचे महत्त्वपूर्ण सामाजिक कार्य हाती घेतले आहे.

याबाबत माहिती अशी की कोरोनाच्या दुसऱ्या टप्प्यात रुग्णांना ऑक्सीजन बेड, रेमडेसिव्हर इंजेक्शन व इतर आरोग्य सुविधा मिळवण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांना धावाधाव करावी लागते याची जाणीव ठेवून रुग्णांची होणारी परवड पाहून रॉयल कारभार ग्रुपने मित्र परिवाराच्या सहकाऱ्यांनी मदतीचा हात पुढे करून स्वखर्चाने कोविड उपचार केंद्रात मोफत जेवण देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. सद्या कराड परिसरातील आठ ते दहा रुग्णालयात रुग्णांना मोफत जेवण पुरवले जाते. या जेवणातील आहार तज्ज्ञांच्या सल्ल्याने दिले जातात यामध्ये उकडलेली अंडी, भाजी, वरण भात, चपाती व त्या बरोबर पाण्याची बाटली अशा प्रकारचे आहार किट कोवीड रूग्णालयात जाऊन वितरित करण्यात येते. मनसेचे सातारा जिल्हा अध्यक्ष धैर्यशील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व मनसे जिल्हा स्वयंमरोजगार संघटक सुरज लोहार यांच्या सहकार्यातून महाराष्ट्र राज्य रॉयल कारभार ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष सौरभ दादा जाधव यांच्या संकल्पनेतून हा सामाजीक उपक्रम राबवला जातो. सदर विनामूल्य जेवणासाठी सकाळी दहा वाजेपर्यंत व सायंकाळी सहा च्या अगोदर गरजुनी संपर्क साधणे गरजेचे आहे. रॉयल कारभार ग्रुपचे शिलेदार सुरज पाटोळे, अनिकेत भोसले, नरेंद्र पाटील, प्रशांत पाटील, असिफ सय्यद यांच्यासह अनेक युवा सामाजिक कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत. 

सदरचा उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रात जलदगतीने राबवण्याचा संकल्प स्थानिक कार्यकर्ते घेऊ लागले आहेत. सद्या ज्या ठिकाणी कोरोना रुग्णाची संख्या वाढत आहे त्याठिकाणी जमावबंदी आदेश असतो अशा परिस्थितीत ताजा भाजीपाला घेऊन येताना पोलीस यंत्रणा, आरोग्य विभाग, व महसूल विभागाचे सहकार्य लाभत आहे. चांगल्या कार्याला नेहमीच सहकार्य लाभत आहे. समाजातील एक वर्ग कोविड सेंटर उभारून रुग्णांची सेवा करत आहे. असे असताना आपणही खारीचा वाटा उचलावा म्हणून ऍडमिट केलेल्या रुग्णांना पौष्टीक आहार देवून रुग्ण व नातेवायकाना दिलासा मिळत आहे. या कार्यासाठी रॉयल कारभार ग्रुपचे सदस्य सागर चन्ने, अजित साळुंखे, सुहास माने, केतन साळुंखे, नितीन कुंभार, अनिकेत साळुंखे, उमेश कदम, अमोल काशीद, संतोष जाधव, दिनेश कांबळे, ऋषी ठाकूर, तुषार जगदाळे, साहिल सुतार, मंगेश दुमाणे, गणेश रजपूत, विजय दुर्गावले यांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे. 

या उपक्रमाबद्दल अनेक मान्यवरांनी रॉयल कारभार ग्रुपचे कौतुक केले आहे. पुढील आठवड्यात खटाव - माण तालुक्यात कोविड केंद्र व कोविड हॉस्पिटल मध्ये रुग्ण व रुग्णाच्या नातेवाईकांना मोफत जेवण पुरवण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. अशी माहिती रॉयल कारभार ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष सौरभ दादा जाधव यांनी दिली आहे.