कुंभारगाव येथील पडवळवाडी कोरोना हॉटस्पॉटच्या दिशेने.

कुंभारगाव ता पाटण येथील पडवळवाडी येथे 8 जण कोरोनाबाधित. विभागात खळबळ...! तळमावले | राजेंद्र पुजारी :                

कुंभारगाव ता. पाटण या ग्रामीण विभागात बनपुरी नंतर पडवळवाडी कोरोनाचा हॉटस्पॉट होताना समोर येत आहे. काही दिवसांपासून या वाडीतील नागरिकांना, सर्दी, ताप, याचा त्रास जाणवू लागल्याने ते खाजगी दवाखान्यात उपचार घेत होते, कर्तव्य दक्ष पोलीस पाटील अमित शिंदे यांच्या हि बाब लक्षात आल्या नंतर त्यांनी तळमावले प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.यू.जी. गोंजारी यांना माहिती दिली. माहिती मिळताच क्षणाचा विलंब न लावता पडवळवाडीत अँटीजेन टेस्ट कॅम्प लावून एकूण 16 रुग्णांची तपासणी करण्यात आली या मध्ये 8 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले.

या घटनेमुळे कुंभारगाव विभागात खळबळ उडाली आहे. बााधीत 8 जणांना प्रशासनाने होम आयसोलेशन केले आहे. या तपासणी कॅम्प मध्ये वैद्यकीय अधिकारी डॉ.यू.जी.गोंजारी, आरोग्य सेविका कांबळे मॅडम, आरोग्य कर्मचारी रोहीत बोकरे, व्ही जी फाळके, जे एफ पावरा, आशा सेविका मनीषा शिंदे, अंगणवाडी सेविका खिचडे, पोलीस पाटील अमित शिंदे, ग्रामपंचायत कर्मचारी सुभाष चोरगे, आदींनी सहभाग घेतला.