चुनाभट्टी येथील सोमय्या मैदानावर म्हाडा कोविड सेंटर उभारणार

मुंबई | कृष्णाकाठ वृत्तसेवा :  मुंबई शहरात नवीन चार कोविड सेंटर उभारण्यात येत आहेत. यातील चुनाभट्टीच्या सोमय्या मैदान येथील सेंटरच्या उभारणीची जबाबदारी म्हाडाकडे देण्यात आली असून १२०० बेड्सचे सेंटर उभारण्यासाठी निविदा मागवण्यात आली आहे. पुढील आठवड्यात कामास सुरवात होणार असून महिन्याभरात काम पूर्ण करणार आहे.हे कोविड सेंटर उभारण्यासाठी चेंबूरचे नगरसेवक अनिल पाटणकर व नगरसेविका आशा मराठे यांनी विशेष मागणी केली होती.

सोमय्या मैदानातील १७०० चौ मीटर जागेवर १२०० बेडसचे कोविड सेंटर असणार आहे. या सेंटरच्या उभारण्यासाठी निविदा मागवण्यात आली आहे. आता तीन-चार दिवसांत निविदा अंतिम करत आठवड्याभरात कामाला सुरुवात करण्यात येणार आहे. तर महिन्याभरात काम पूर्ण करत हे सेंटर मुंबई महापालिकेकडे हस्तांतरित करण्यात येणार असून या कामासाठी ५५ कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित आहे. सद्या रुग्णालयात वा कोविड सेंटरमध्ये आगीच्या घटना घडत आहेत.या पार्श्वभूमीवर अशा कोणत्याही घटना येथे घडू नये यादृष्टीने सर्व परवानगी घेत आणि त्यादृष्टीने सर्व उपाययोजना करत सेंटरची उभारणी करण्यात येणार असल्याचेही म्हाडाचे मुख्य अभियंता सुनील जाधव यांनी सांगितले आहे.

Popular posts
मंत्री ना.शंभूराज देसाई यांचे प्रयत्नातून जलजिवन मिशन योजनेअंतर्गत पाटण तालुक्यातील 101 नळ पाणी पुरवठा योजनांसाठी 29 कोटी 30 लक्ष रुपयांचा निधी मंजूर.
इमेज
अंजली माधवराव चव्हाण यांचे दुःखद निधन
इमेज
काकासाहेब चव्हाण महाविद्यालयाचा झेप नियतकालिक अंक वेधक व प्रेरणादायक : संजय देसाई
इमेज
श्री मळाईदेवी पतसंस्थेची दहा टक्के लाभांश परंपरा कायम : शेतीमित्र अशोकराव थोरात.
इमेज
गृहपाठ बंद झाले, आता शिक्षणच बंद करा : अशोकराव थोरात
इमेज