लॉकडाऊनच्या निर्बंधाचे उल्लंघन केल्याने ढेबेवाडी येथील एका दुकानावर कारवाई.

 

छाया : अनिल देेेेसाई

ढेबेवाडी |  कृष्णाकाठ वृत्तसेवा :
सातारा जिल्ह्यात 15 मेपर्यंत कडक लॉकडाऊनचे आदेश असताना ढेबेवाडी तालुका पाटण येथील मंद्रुळकोळे गावच्या हद्दीतील आपला बझार हे किराणा दुकान निर्बंधाचे उल्लंघन करून चालू ठेवले होते हे निदर्शनास येताच ढेबेवाडी पोलीस स्टेशन व मंद्रुळकोळे ग्रामपंचायत यांनी संयुक्तपणे आपला बझार चालकावर दंडात्मक कारवाई करून पाच हजार रुपये दंड वसूल केला. 

यावेळी ढेबेवाडी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ढेबेवाडी पोलीस स्टेशनचे कर्मचारी वेताळ, शेळके, संदेश लादे, अजय माने, होमगार्ड तसेच मंद्रुळकोळे ग्रामपंचायतीचे कर्मचारी यांनी या कारवाईत भाग घेतला. यावेळी मंद्रुळकोळे ग्रामपंचायतीचे सरपंच अमोल पाटील हे ही उपस्थित होते.
____________________________________

ढेबेवाडी पोलीसांची विनाकारण फिरणाऱ्यावर मोठी कारवाई .

लॉकडाऊनच्या काळात विनाकारण फिरणाऱ्यांची संख्या वाढत होती. ढेबेवाडी पोलिसांच्या हे निदर्शनास येताच या आठवड्यात दुचाकीवरून विनाकारण फिरणाऱ्या 50 जणांना ताब्यात घेवून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली.
____________________________________