ढेबेवाडीतील "या" दोन युवकांनी घडवले दातृत्वाचे दर्शन.

 

ढेबेवाडी | नितीन बेलागडे :

रणरणत्या उन्हात दररोज पाण्यासाठी दाही दिशा फिरणाऱ्या ग्रामस्थ व महिलांची अडचण ओळखून येथिल योगेश ढेब व प्रकाश ढेब यांनी स्वताच्या कृपनलिकेचे हजारो लिटर पाणी मोफत देऊन दातृत्वाचे दर्शन घडवले आहे त्यामुळे ग्रामस्थांची पाण्यासाठी होणारी पायपीट थांबली आहे.

येथिल योगेश ढेब व प्रकाश ढेब यांनी दातृत्वाची भावना कधीच नजरेआड केली नाही. ढेबेवाडी येथे गत आठ दिवस भारत निर्माण नळपाणीपुरवठा योजनेचा मेन वाॅल मध्ये तांत्रिक बिघाड झाला होता त्या मुळे लोकांचे पाण्यासाठी मोठे हाल झाले लोकांना डोक्यावर घागर घेऊन पाण्यासाठी भटकंती करावी लागली या वेळी लोकांना पुन्हा एकदा पंचायतीच्या सुस्त कारभाराची प्रचिती आली मात्र अशा वेळी लोकांना एक दोन नव्हे तर रोज हजारो लिटर पाणी मोफत देऊन योगेश ढेब व प्रकाश ढेब यांनी दातृत्वाच दर्शन घडवले आहे त्यामुळे  यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
____________________________________
शेजारी असलेल्या ढेबआळी (ढेबेवाडी) येथिल नळ पाणीपुरवठा योजनेची पाईप लाईन ढेबेवाडी गावठाण हद्दीलगत गेली असल्याने ढेबेवाडी येथिल काही कुटुंबांना या योजनेची कनेक्शन देण्यात आली आहेत. पिण्याच्या पाण्यासाठी याचा उपयोग मोठ्या प्रमाणात होतो मात्र काही विकृत प्रवृत्ती इलेक्ट्रीक मोटार लावून पाणी खेचत असुन पाणी भरुन झाल्यावर रस्त्यावर पाणी मारण्याचा किळसवाणा प्रकार येथे घडताना दिसुन आला आहे. एका बाजूला लोकांचे पाण्यासाठी हाल होत असताना अशा विकृत प्रवृत्तीवर मंद्रुळकोळे ग्रामपंचायतीने कडक कारवाई करायला हवी किंबहुना बेकायदेशीररित्या नळाचे कनेक्शन घेवून ग्रामपंचायतीची फसवणूक करणाऱ्यावर मंद्रुळकोळे ग्रामपंचायतीने चौकशी करून कारवाई करायला हवी. 
____________________________________