लाॅकडाउन काळात मुलांसाठी आउट डोअर खेळ घरातच, रेठरे बु गावच्या civil इंजिनियर आरीफ मुजावर यांचे संशोधनाचे सर्वत्र कौतुक

 कराड | कृष्णाकाठ वृत्तसेवा :

सध्या चालू असलेल्या लॉक डाऊन च्या काळात सर्व लहान मुले ही गेली दीड वर्षे घरातच राहून आहेत. त्यांना आउट डोअर गेम्स खेळता येत नाहीत त्यामुळे त्यांच्यात बरेचशे शारिरीक, मानसिक , सामाजिक अधोगती होत आहे. सदर तरतुद जिना असलेल्या घरात करता येवू शकते . मुलांना घसरगुंडी म्हणजे सर्वात आवडीचा खेळ ,ती बागेशिवाय मिळत नाही,सध्या सर्व बाग बागीचे बंद आहेत. मुलांना हिच सुविधा घरच्या घरी झाली तर त्यांच्यातील खेळाडु वृत्ती कायम राहील . मुलांना खेळते वेळी लक्ष देने गरजेचे असतेच.

 या घसरगुंडीचा वापर अवजड सामान जसे गॅस सिलींडर , धान्याची पोती वाहतूक करनेस होवू शकतो .जेव्हा वापर नसेल तेव्हा ही घसरन उभी करुन ठेवता येवू शकते त्यावेळी त्याचा साइड ग्रील म्हणून वापर होतो. ही तरतुद करने साठी काही हार्डवेअर मटेरियल व वेल्डींग कारागिराची गरज आहे. ३-४इंच बाय १इंच लोखंडी पाइप एक मेकांना उल्टया बाजुस वेल्ड करने जिन्याच्या लांबीप्रमाणे कट करणे बिजागरी, चुंबक याचा वापर करुन इंस्टोलेशन करने.

     आरीफ मुजावर हे रेठरे बुद्रुक गावातील सिव्हील इंजिनीअर आहेत त्यांनी पदवी अभ्यास जयवंत कॉलेज आॉफ इंजिनीअरींग किल्ले मच्छिंद्रगड येथे करुन पदवीउत्तर अभ्यासक्रम अशोकराव माने काॅलेज वाठार येथे केला आहे.

अफॉरडेबल हाउसींग सिशटीम (परवडनारी घरे) , पुर संरक्षन , कंफरटेबल स्टेअर्स असे विवीध प्रोजेक्ट त्यांनी केले आहेत. सध्या सिव्हील कामात ते सक्रीय आहेत. सदर रिसर्च ची 'irjet' या अंतर राष्ट्रीय जर्नल ने प्रकाशन केले आहे.