चेंबूरमधील नाले सफाईसाठी नगरसेविका आशाताई मराठेंचा पालिकेकडे पाठपुरावा.

मुंबई | कृष्णाकाठ वृत्तसेवा : कोरोनाच्या काळातील लॉक डाउनमध्येही चेंबूरच्या वॉर्ड क्रमांक १५२ मधील नागरिकांच्या पावसाळ्यातील पाणी तुंबण्याच्या समस्येकडे स्थानिक भाजपा नगरसेविका आशाताई मराठे यांनी विशेष लक्ष केंद्रित करून इथल्या सर्व नाल्यांच्या साफसफाईसाठी यशस्वी पाठपुरावा सुरु केला आहे.

नगरसेविका आशाताई मराठे यांनी पोस्टल कॉलनी , सिद्धार्थ कॉलनी,सुभाष नगर व इतर भागात दरवर्षी पावसाळ्यात साचणाऱ्या पाण्याचा निचरा कसा होईल यासाठी पालिकेने उपाययोजना राबवाव्यात म्हणून सातत्याने प्रयत्न सुरू केले आहेत.त्यांच्या 

प्रयत्नांमुळेच सध्या या विभागात विविध ठिकाणी नाले सफाई , छोट्या गटार दुरुस्तीची कामे वेगाने सुरू आहेत.या वार्डातील पावसाळ्यात साचणारे पाणी पुढे मोठ्या गटारात कसे वळविता येईल याची पाहणी करण्यासाठी नुकतीच पालिका अधिकाऱ्यांसोबत आशाताई मराठे यांनी प्रत्यक्ष नाला परिसराला भेट दिली.

यावेळी येणाऱ्या काही अडचणी अधिकाऱ्यांना सांगितल्या. तसेच पालिका अधिकाऱ्यांनी सुद्धा काही न काही पर्याय उपलब्ध करून हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आश्वासन दिले .

Popular posts
मंत्री ना.शंभूराज देसाई यांचे प्रयत्नातून जलजिवन मिशन योजनेअंतर्गत पाटण तालुक्यातील 101 नळ पाणी पुरवठा योजनांसाठी 29 कोटी 30 लक्ष रुपयांचा निधी मंजूर.
इमेज
अंजली माधवराव चव्हाण यांचे दुःखद निधन
इमेज
काकासाहेब चव्हाण महाविद्यालयाचा झेप नियतकालिक अंक वेधक व प्रेरणादायक : संजय देसाई
इमेज
श्री मळाईदेवी पतसंस्थेची दहा टक्के लाभांश परंपरा कायम : शेतीमित्र अशोकराव थोरात.
इमेज
गृहपाठ बंद झाले, आता शिक्षणच बंद करा : अशोकराव थोरात
इमेज