आनंदराव चव्हाण पतसंस्थेला ७२ लाखांचा नफा ; अभिजीत पाटील यांची महिती.

 

ढेबेवाडी|कृष्णाकाठ वृत्तसेवा :
आनंदराव चव्हाण ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मंदुळकोळे ता.पाटण या संस्थेने आर्थिक वर्षात 112 कोटी एकत्रीत व्यवसाय केला असून संस्थेस 72 लाख 50 हजार नफा झाला असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांनी दिली 

    मार्च 2021 अखेर संपलेल्या आर्थिक वर्षात संस्थेच्या ठेवी 64 कोटी 36 लाख झाल्या असून 47 कोटी 97 लाख कर्ज वितरण करण्यात आले आहे संस्थेची 15 कोटी37 लाख गुंतवणूक असून 2 कोटी 32 लाख संस्थेचे भागभांडवल आहे 6 हजार 86 सभासद व संस्थेच्या 11 शाखा आणि मुख्यकार्यालय आहे 

   याबाबत माहिती देताना संस्थेचे अध्यक्ष अभिजीत पाटील म्हणाले संस्थेची आधुनिकीकरणाकडे वाटचाल सुरू असून 26 वर्षाच्या कालावधीत संस्थेने जिल्हात वेगळी ओळख निर्माण केली आहे सभासदांचे हित हेच संस्थेचे हित हा आदर्श डोळ्यासमोर ठेवून संस्थेची वाटचाल सुरू आहे असे सांगून म्हणाले 1994 साली ढेबेवाडी सारख्या ग्रामीण भागात हिंदुराव पाटील यांनी संस्थेची स्थापना करून परिसरातील लोकांना सावकारी विळख्यातून बाहेर काढले गेल्या वर्षापासून कोरोनाचे सावट असताना देखील संस्थेने नेत्रदीपक प्रगतीकेली आहे यामध्ये संस्थेचे संचालक सल्लागार कर्मचारी यांचे योगदान आहे सभासद व ठेवीदारांच्या हिताच्या दृष्टीने वेगवेगळ्या ठेव योजना राबवल्या आहेत त्यांमुळे लोकांचा संस्थेकडे वाढत चाललेला कल संस्थेच्या प्रगतीचे शिखर आहे असे म्हणाले.