कराड चांदोली मार्गावर उंडाळे नजीक दुचाकी पुलावरून कोसळल्यामुळे भीषण अपघात. दोघे जण जागीच ठार, तर एक जण गंभीर जखमी.


उंडाळे | कृष्णाकाठ वृत्तसेवा :
कराड चांदोली मार्गावर उंडाळे नजीक कराड दक्षिण मांड नदीवर बांधकाम सुरू असलेल्या पुलावरून रविवारी मध्यरात्री  दुचाकीवरुन ट्रिपल सीट प्रवास करणारे  कोल्हापूर जिल्ह्यातील भेंडवडी( ता. हातकणंगले) येथील दोन युवक  बांधकाम सुरु असलेल्या नदीत  दुचाकीसह कोसळून   दोन जण जागीच ठार झाले तर एक जण गंभीर  जखमी झाल्याची दुर्देवी घटना घडली.

  याबाबत घटनास्थळावरून समजलेली माहिती अशी की रात्री दीड ते दोन वाजण्याच्या सुमारास उंडाळे कडून कराड कडे  तिघेजण MH - 09-FP4022   या दूचाकी गाडीवरून कराडकडे निघाले होते‌. उंडाळे येथे दक्षिण मांड नदीवर पुलाचे काम सुरू असल्यामुळे  ठेकेदाराने बॅरिकेट्स लावले होते. दुरवरुन पर्यायी रस्ता दिला असल्याने व पर्यायी रस्त्याच्या नजीक जवळून असलेल्या दुसऱ्या  रस्त्यावरून  रात्रीचा रस्त्याचा अंदाज  न आल्यामुळे  व पुढे रस्ता मोकळा असू शकेल या विचाराने मोकळ्या रस्त्यावरून भरधाव वेगाने ते  बांधकाम  सुरू असलेल्या पुलाचे ठिकाणी नदीत कोसळले.

 या वेळी रात्री दीड वाजता पुलानजीक काम करत असलेल्या बांधकाम कामगारांनी हा अपघात पाहताच अपघातग्रस्ताना मदत करुन बाहेर घेतले.पण तत्पूर्वी दोघांचा जागीच मृत्यू झाला होता. 
मृत व्यक्ती मध्ये  जाणू भैरू झोरे व कोंडीबा भागोजी पाटणे हे दोघे असून दगडू धिरु झोरे हा गंभीर जखमी झाला आहे तिघेही कोल्हापूर जिल्ह्यातील भेंडवडे ता. हातकणंगले जिल्हा कोल्हापूर येथील आहेत.
या घटनेची खबर रात्रीच कराड तालुका पोलिसांना  देण्यात आली तेव्हा घटनास्थळी कराड तालुका पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र डांगे व त्यांचे सहकारी दाखल झाल्यानंतर मृतदेह बाहेर काढण्यात आले व जखमीला कराडच्या कृष्णा रुग्णालयात दाखल करण्यात आले .याबाबत कराड तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून अधिक तपास फौजदार डांगे करत आहेत.