मुंबईतील म्हाडाची लॉटरी लागलेल्या घरांचा ताबा देण्याची प्रक्रिया लांबणीवर

मुंबई | कृष्णाकाठ वृत्तसेवा : राज्य सरकारच्या म्हाडाच्या मुंबई मंडळाने अडीच वर्षापूर्वी काढलेल्या लॉटरीतील घरांचा ताबा पुन्हा एकदा लांबणीवर पडला आहे. रक्कम भरूनही कोरोना काळात अनेक किती महिनेही घराची प्रतीक्षा करावी लागणार? अशा प्रश्न हवालदिल लाभार्थी पडला आहे.

म्हाडाने २०१८ साली मानखुर्द,अँटॉप हिल, प्रतीक्षा नगर (सायंन), कांदिवली महावीरनगर, गोरेगाव या भागातील घराची लॉटरी काढली होती. त्यातील २९४४ घरे गेल्या वर्षापासून मुंबई महापालिकेने कोरोनाबाधित रुग्णांना क्वॉरंटाईन करण्यासाठी आपल्या ताब्यात ठेवली आहेत. या लॉटरीतील अनेक लाभार्थीनी घरांची रक्कम म्हाडाकडे अदा केली आहे. अनेक लाभार्थीनी बँकेच्या कर्जाचे हप्ते व्याजासह गेल्या दोन वर्षांपासून भरावे लागत आहे. आता या वर्षातही घराचा ताबा मिळेल ही शक्यता आता भुसर झाली आहे. घरांची ताब्याची मुदतवाढ म्हाडाने द्यावी,पण घराचा रक्कमेवरील म्हाडाने व्याज न घेता दिलासा द्यावा, अशी मागणी लाभार्थी करत आहे.