मुंद्रुळकोळेत कोरोना प्रतिबंधक लसीकरणास प्रतिसाद.

कोरोना प्रतिंबंधक लस घेताना काँग्रेसचे नेते हिंदुराव पाटील व माजी जिल्हा परिषद सदस्या मंदाकिनी पाटील.

 ढेबेवाडी|कृष्णाकाठ वृत्तसेवा :   
  मुंद्रुळकोळे ता.पाटण येथे प्राथमिक आरोग्य केंद्र सणबुर यांच्या विद्यमाने आणि ग्रामपंचायत मंद्रळकोळे यांच्या सहकार्याने कोविड 19 लसीकरण मोहिमे अंतर्गत 180 ग्रामस्थांना लस देणेत आली.लसीकरण मोहिमेस उस्फुर्त प्रतिसाद मिळाला

     लसीकरण मोहिमेचा शुभारंभ पाटणचे तहसीलदार यांच्या मार्गदर्शनाखाली गटविकास अधिकारी मीना साळुंखे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आर.बी.पाटील, यांच्या उपस्थितीत झाला या मोहिमेस मंद्रळकोळे गावातील नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. पाटण तालुका काँग्रेसचे नेते हिंदुराव पाटील (बापू), माजी जि. प.सदस्या सौ. मंदाकिनी पाटील यांनी या मोहिमेत कोरोना लस घेतली. यावेळी सरपंच अमोल पाटील,पोलिस पाटील विजय लोहार,ग्रा. पं. सदस्य सर्जेराव पाटील आदीजण उपस्थित होते.   

    कोरोनाची दुसरी लाट चालू झाली असून परिस्थिती गंभीर होत आहे आशावेळी शासनाने 45 वर्षावरील नागरिकांना मोफत लसीकरण चालू केले आहे याविषयी जागृतीही सुरु आहे. मंद्रळकोळे सरपंच अमोल पाटील यांनी स्पिकर गाडीचे नियोजन करून संपूर्ण गावात लसीकरण संदेश पोहचवला होता याशिवाय आशा सेविका, अंगणवाडी सेविका यांचे मार्फतही संदेश देण्यात आला होता.काही ग्रामस्थांनी या अगोदर ढेबेवाडी ग्रामीण रुग्णालयात लस घेतली होती आज दिवसभरात गावातील 45 वरील नागरिकांनी 180 जणांनी लस घेतली आहे.

       लसीकरण मोहीम यशस्वी करणेसाठी सणबुर प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत सी एच ओ डॉ कोमल लोकरे, सी एच ओ बंडू घोडेकर, डॉ.सुनील जाधव आरोग्य सेविका श्रीमती मेघा मराठे, आरोग्य सेविका करवते, आरोग्य सेवक शंतनू पाटील , कुलदीप मसने, आशा गट प्रवर्तक, आशा सेविका तसेच इतर आरोग्य कर्मचारी ग्रामपंचायत कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.