मयूर शेळकेच्या शौर्याचे सीसीटीव्ही फुटेज रेल्वेकडून दडपण्याचा प्रयत्न

 


मुंबई - सेंट्रल रेल्वे मुंबई डिव्हिजनमध्ये काम करणाऱ्या मयूर शेळकेने काही सेकंदात एका चिमुकल्याचा जीव वाचविला होता. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. मात्र मयूर शेळकेने केलेल्या या शौर्याचे सीसीटीव्ही फुटेज रेल्वेकडून

दाबून ठेवण्याचा प्रयत्न झाला होता अशी धक्क्यादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता रेल्वे कामगार संघटनेने या प्रकाराची चौकशी करण्याची मागणी केली आहे.तर रेल्वेनेही त्यास सकारात्मक प्रतिसाद देत चौकशी सुरू केली आहे.

जर मोबाईल व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली नसती तर जगाला कधीच या शौर्याची माहिती नसती असा दावा रेल्वे कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.

मयूरने या घटनेबाबतचे सीसीटीव्ही फुटेज रेल्वेकडे मागितले होते.पण ते त्यांनी त्याला दिले नव्हते.मयूरने साहिल शिरसाट या चिमुकल्याचा जीव वाचविल्याचे चांगले काम मुख्यालयाला सांगा अशी विनंती केल्यानंतरही रेल्वेच्या

अधिकाऱ्यांनी त्याला कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर मयूरने हे फुटेज मोबाईलवर काढून ते सोशल मीडियावर अपलोड केले होते. त्यानंतर ते व्हायरल झाले. त्यामुळेच रेल्वेला त्याच्या शौर्याची दखल घ्यावी लागल्याचे मत कामगार संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे.