चेंबूरमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे महारक्तदान शिबिर


मुंबई |कृष्णाकाठ वृत्तसेवा :  मुंबईसह राज्यभरात कोरोनाच्या काळात रक्त टंचाई जाणवू लागल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनानुसार बेस्टचे माजी अध्यक्ष व नगरसेवक अनिल पाटणकर यांनी चेंबूरच्या घाटले गावात महा रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते .यावेळी अनिल पाटणकर यांनी स्वतः रक्तदान करून उपक्रमाची सुरुवात केली .

यावेळी परिसरातील प्रसिद्ध डॉक्टर संतोष गोसावी ,चेंबूर  विधानसभा संघटक अविनाश राणे ,वॉर्ड क्रमांक १५३ चे शिवसेना शाखा प्रमुख उमेश करकेरा , महिला शाखा संघटक अनिता महाडिक, समाजसेविका मीनाक्षी पाटणकर ,युवा नेता आर्चिस पाटणकर ,ज्येष्ठ शिवसैनिक शशी घाग ,युवासेना शाखा अधिकारी विनय शेट्ये , नवाकाळचे उपसंपादक शंकर कडव आणि शिवसैनिक ,रक्तदाते आदीजण उपस्थित होते.

Popular posts
गुढे वि. का स. सेवा सोसायटी निवडणुकीत शिवसेनेचा 13 - 0 ने मोठा विजय. राष्ट्रवादीच्या पॅनेलचा दारुण पराभव. 20 वर्षांनंतर सत्तातर .
इमेज
बनपुरी सोसायटीत शिवसेना पुरस्कृत स्व. रघुनाथ महादेव पाटील शेतकरी विकास पॅनेलचा 13-0 ने दणदणीत विजय
इमेज
सारंग पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त शाळेतील मुलांना संजीवन प्रतिष्ठान व नवभारत पतसंस्थेच्या वतीने सामाजिक बांधिलकी ,
इमेज
सारंग पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जनसहकार पतसंस्थेच्या वतीने जिजाऊ वस्तीगृहातील मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप
इमेज
काळगाव सोसायटीत विजय तरुणाईचा..
इमेज