दोन राज्याच्या लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या बनपुरी येथील श्री नाईकबा देवाची यात्रा रद्द .

ढेबेवाडी पोलिसांची कडक नाकेबंदी.








(फोटो : संग्रहीत)
ढेबेवाडी |कृष्णाकाठ वृत्तसेवा :
कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर सलग दुसऱ्या वर्षीही श्री नाईकबा देवाची यात्रा रद्द. 
महाराष्ट्रसह कर्नाटक राज्यातील अनेक भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या बनपुरी येथील नाईकबा देवाची यात्रा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आली असल्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी अशोकराव थोरात यांनी सांगितले.

        ढेबेवाडी पोलिस ठाण्यात उपविभागीय पोलीस अधिकारी अशोकराव थोरात सपोनि संतोष पवार यांनी नाईकबा देवस्थान ट्रस्टचे पदाधिकारी,बनपुरी जानुगडेवाडी गावचे सरपंच उपसरपंच, पोलिस पाटील यांची मिटिंग घेतली होती.

      महाराष्ट्रात कोरोनाचा वाढता प्रभाव असून सातारा जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे सातारा जिल्हासाठी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी नवीन नियमावली दिली आहे यानुसार दि 5 एप्रिलपासून 30 एप्रिल पर्यंत कडक निर्बंध लादले आहेत.याकाळात धार्मिक, राजकीय,सांस्कृतिक कार्यक्रमावर निर्बंध आहेत या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यातील एक मोठी श्री नाईकबा देवाची यात्रा यावर्षी दि 18 एप्रिल रोजी होणार होती ती रद्द करण्यात आली आहे.या यात्रेसाठी महाराष्ट्र कर्नाटक राज्यातून सुमारे दोन लाख भाविक येत असतात गेल्या वर्षी कोरोनामूळे यात्रा रद्द करण्यात आली होती यावर्षीही कोरोनाच्या दुसऱ्या टप्प्यात जिल्ह्यात वाढता प्रभाव जाणवत असल्याने य नाईकबाची यात्रा रद्द करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले.

Popular posts
पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या नावे फिरणारी ती पोस्ट चुकीची व खोटी
इमेज
साताऱ्यात राष्ट्रवादीला सुरुंग, राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांचे भाऊ शिवसेनेत दाखल.
इमेज
पाटण बाजार समितीच्या सभापतीपदी बाळकृष्ण पाटील तर उपसभापतीपदी विलास गोंडांबे यांची निवड.
इमेज
मान्याचीवाडी गावाने पटकावला पन्नास लाख रुपयांचा माझी वसुंधरा अभियान राज्यस्तरीय पुरस्कार.
इमेज
कुंभारगाव ग्रामपंचायती तर्फे पुण्य श्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराचे वितरण.
इमेज