श्री संतकृपा इंजिनिअरिंग मध्ये ऑनलाईन सेमिनार संपन्न.

 उंडाळे |कृष्णाकाठ वृत्तसेवा :
घोगाव तालुका कराड येथील श्री संतकृपा शिक्षण संस्था संचलित श्री संतकृपा इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी या अभियांत्रिकी महाविद्यालयात नुकताच विद्यार्थ्यांसाठी एक दिवसीय सेमिनार संपन्न झाला. 

"Research paper writting" या विषयावर हा एकदिवशिय ऑनलाईन सेशन पार पडला. 

या वेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्री. स्वानंद कुलकर्णी सर यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

या महत्त्वपूर्ण सेमिनारसाठी एकूण ११५ विध्यार्थी आणि स्टाफनी सहभाग नोंदवला. या ऑनलाईन सेमिनारचे श्री संतकृपा इंजिनिअरिंग महाविद्यालयाच्या अकॅडमिक डेव्हलपमेंट कमिटी मार्फत आयोजन करण्यात आले होते.

या ऑनलाईन सेमिनारसाठी श्री संतकृपा शिक्षण संस्थेचे सेक्रेटरी श्री. प्रसून जोहरी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.