अमित ठाकरेंना रुग्णालयायातून डिस्चार्ज ,१४ दिवस घरीच क्वारंटाईन



मुंबई | कृष्णाकाठ वृत्तसेवा : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र मनसे नेते अमित ठाकरे यांना लिलावती रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला असून कोरोनाची लागण झाल्यानंतर २० एप्रिलला अमित ठाकरेंना लीलावती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. कोरोनाची लक्षणे कमी झाल्याने शनिवारी त्यांना रुग्णालयाकडून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

अमित ठाकरे यांना सर्दी आणि ताप जाणवत होता. त्यांची कोरोनाची चाचणी करण्यात आली आणि हा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर त्यांची प्रकृती आणखी बिघडली आणि त्यांच्यावर तातडीने लिलावतीत उपचार सुरू करण्यात आले होते. मात्र, त्यांच्यात आता कोरोनाची लक्षणे कमी झाली आहेत. त्यामुळे त्यांना चार दिवसातच रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. मात्र, त्यांना १४ दिवस घरीच क्वॉरंटाईन राहावे लागणार आहे.