मुंबईच्या बिकेसीतील सर्वात मोठे लसीकरण केंद्र बंद ,नागरिक त्रस्त

 

मुंबई - मुंबईतील सर्वात मोठे लसीकरण केंद्र असलेल्या बीकेसी कोविड सेंटरमधील लसीच्या तुटवड्यामुळे आज बुधवारी लसीकरण बंद ठेवण्यात आले. वेळेत नागरिकांना लसीकरण बंद असल्याचे समजताच नागरिकांना निराश होऊन परतावे लागले. 

 मंगळवारी बीकेसीत लसीकरण झाले. तर बुधवारसाठी रात्री लसीचा साठा येणार होता. त्यामुळे बुधवारी लसीकरण सुरू राहील, असे जाहीर करण्यात आले होते. मात्र काल रात्री साडे अकरा वाजेपर्यंत लसीचा साठा आला नाही. तेव्हा रात्री उशिरा व्यवस्थापनाने लसीकरण बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती डॉ राजेश डेरे, अधिष्ठाता, बीकेसी कोविड सेंटर यांनी दिली. तर आता जेव्हा केव्हा लसीचा साठा उपलब्ध होईल, तेव्हा लसीकरण पुन्हा सुरू होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. बीकेसी कोविड सेंटर हे सर्वात मोठे लसीकरण केंद्र आहे. तर देशातील सर्वाधिक लसीकरण या केंद्रावर होते. तर या केंद्रात मिळणाऱ्या सुविधा लक्षात घेता नागरिक मोठ्या संख्येने या केंद्रात येतात. पण अनेकदा लसीचा तुटवडा येथे निर्माण होत असल्याने आणि त्याची माहिती योग्य वेळी नागरिकाना उपलब्ध होत नसल्याने त्यांना केंद्रात येऊन परत जावे लागत आहे. त्यामुळे त्यांच्यात मोठी नाराजी दिसत आहे.

Popular posts
गुढे वि. का स. सेवा सोसायटी निवडणुकीत शिवसेनेचा 13 - 0 ने मोठा विजय. राष्ट्रवादीच्या पॅनेलचा दारुण पराभव. 20 वर्षांनंतर सत्तातर .
इमेज
बनपुरी सोसायटीत शिवसेना पुरस्कृत स्व. रघुनाथ महादेव पाटील शेतकरी विकास पॅनेलचा 13-0 ने दणदणीत विजय
इमेज
सारंग पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त शाळेतील मुलांना संजीवन प्रतिष्ठान व नवभारत पतसंस्थेच्या वतीने सामाजिक बांधिलकी ,
इमेज
सारंग पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जनसहकार पतसंस्थेच्या वतीने जिजाऊ वस्तीगृहातील मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप
इमेज
काळगाव सोसायटीत विजय तरुणाईचा..
इमेज