मान्याचीवाडी (कुंभारगांव) येथे देशी दारुची बारा बॉक्स जप्त ; उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई.

 

ढेबेवाडी|कृष्णाकाठ वृत्तसेवा :
उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या कारवाईत मान्याचीवाडी (कुंभारगांव) ता.पाटण येथे देशी दारुची बारा बॉक्स जप्त केली. कुलुपबंद दुकानगाळ्यात लपवून ठेवलेली दारु उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी कुलूप तोडून ताब्यात घेतल्याने उशिरापर्यंत यातील आरोपी कोण याची माहिती उपलब्ध झाली नाही. दरम्यान कडक लॉकडाऊन असतानाही दारुला पाय फुटले कुठून? याची चर्चा शनिवारी दिवसभर विभागात चालू होती. 

     याबाबत सविस्तर माहिती अशी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी रात्री पासून या विभागात सर्वत्र व्यापाऱ्यांसह नागरिकांनीही  कडक लॉकडाऊनसाठी शासनाच्या आदेशाचे पालन करत घरीच बसणे पसंत केले. ठिकठिकाणी पोलीसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यातूनही मान्याचीवाडी (कुंभारगांव) येथे एका दुकानगाळ्यात मोठ्या प्रमाणात देशी दारुचा स्टॉक केल्याची खबर उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली. 

    त्यानुसार उत्पादन शुल्क विभागाचे सहाय्यक निरिक्षक शिरीष जंगम, भीमराव माळी, जयवंत माने, पोलीस पाटील अमित शिंदे, प्रविण मोरे आदिंनी या कारवाईत सहभाग घेतला. 

----------------------------------------------------------

नेमकी दारु कोणाची ? ढेबेवाडी विभागात चर्चेला उत

कडक लॉकडाऊन असताना जप्त करण्यात आलेली दारु कोणाची , ती कुठून आली? याबाबत उशिरापर्यंत उलघडा झाला नाही. मात्र एवढा पोलीस बंदोबस्त असतानाही बेकायदेशीर रित्या दारुचे कोठार सापडल्याने उलटसुलट चर्चा चालू झाली आहे.

ढेबेवाडी विभागातील असे चोरीछुपे चालणारे बेकायदेशीर दारूधंदे ढेबेवाडी पोलिसांनी शोधून काढून त्यांच्यावर कडक कारवाई करणे काळाची गरज आहे. लॉकडाउनच्या अशा काळात अशा बेकायदेशीर दारू धंद्यांना ऊत येत असतो. यातूनच सामाजिक स्वास्थ्य धोक्यात येत असते. ढेबेवाडी पोलीस स्टेशनचे स.पो.नि संतोष पवार यांनी विभागात करडी नजर ठेवून असे धंदे करणाऱ्या लोकांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांतून होत आहे.

----------------------------------------------------------


      

Popular posts
पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या नावे फिरणारी ती पोस्ट चुकीची व खोटी
इमेज
साताऱ्यात राष्ट्रवादीला सुरुंग, राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांचे भाऊ शिवसेनेत दाखल.
इमेज
पाटण बाजार समितीच्या सभापतीपदी बाळकृष्ण पाटील तर उपसभापतीपदी विलास गोंडांबे यांची निवड.
इमेज
मान्याचीवाडी गावाने पटकावला पन्नास लाख रुपयांचा माझी वसुंधरा अभियान राज्यस्तरीय पुरस्कार.
इमेज
कुंभारगाव ग्रामपंचायती तर्फे पुण्य श्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराचे वितरण.
इमेज