माजी मुख्यमंत्री आ.पृथ्वीराज चव्हाण यांनी कराडच्या उपजिल्हा रूग्णालयात घेतली कोरोना लस


कराड|कृष्णाकाठ वृत्तसेवा : कोरोनावर मात करण्यासाठी राज्यात लसीकरण मोहिम सुरू आहे. कोविड लसीकरण कार्यक्रमाच्या तिसऱ्या टप्यात आज माजी मुख्यमंत्री आ पृथ्वीराज चव्हाण यांनी कोरोनाची लस घेतली. कराड येथील उपजिल्हा रुग्णालयात अधीक्षक डॉक्टर प्रकाश शिंदे, तालुका वैद्यकीय अधिकारी संगीता देशमुख, प्रांताधिकारी उत्तमराव दिघे यांच्या उपस्थितीत कोरोना लस त्यांना देण्यात आली. माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्यासोबत त्यांचे बंधू अधिकराव चव्हाण आणि त्यांचे केअर टेकर नामदेव चन्ने अशा तीन जणांना लस देण्यात आली. लस घेतल्यानंतर त्यांना 30 मिनिटं निरीक्षणाखाली ठेवण्यात आलं होतं. दुसरी लस 28 दिवसांनी दिली जाईल. यावेळी आ. चव्हाण यांच्यासोबत मलकापूरचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, कराडचे नगरसेवक राजेंद्र माने, राहुल चव्हाण आदी उपस्थित होते.

प्रारंभी अधिक्षक शिंदे यांनी आ.पृथ्वीराज चव्हाण यांचे स्वागत केले. यावेळी आ.चव्हाण यांनी कोविड लसीकरणासाठी आलेल्या ज्येष्ठ नागरिकांची विचारपूस करीत लसीकरण केंद्राची पाहणी केली व अधिक्षक शिंदे यांच्याकडून कोविड लसीकरणाची आत्तापर्यंतची माहिती घेतली.