सातारा जिल्हा काँग्रेस कमिटी व कराड दक्षिण काँग्रेस कमिटीच्यावतीने मलकापूर भारती विद्यापीठ येथे रक्तदान शिबीर संपन्न

 


कराड | कृष्णाकाठ वृत्तसेवा :

कोविड-19 चा वाढता प्रादुर्भाव विचारात घेता व रुग्णांना रक्ताची आवश्यकता भासत आहे. त्याअनुषंगाने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी यांचे सुचनेप्रमाणे व कराड दक्षिण काँग्रेस कमिटी यांचेवतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे 130व्या जयंतीचे औचित्य साधून रक्तदान शिबीर आयोजित करणत आले. रक्तदान शिबीराचे उद्घाटन आमदार पृथ्वीराज चव्हाण (बाबा), माजी मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. 

सदर शिबीर प्रसंगी आमदार पृथ्वीराज चव्हाण (बाबा),  यांनी सांगितले की, कराड दक्षिण काँग्रेस कमिटी यांचेवतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे 130व्या जयंतीचे औचित्य साधून रक्तदान शिबीर आयोजित केले त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो. मलकापूर नगरपरिषदेने अनेक नाविण्यपुर्ण उपक्रम राबवून देशामध्ये एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. महाराष्ट्र राज्य शासनाने दि.14/04/2021 रोजी रात्री 8.00 वाजलेपासून संचारबंदी लागु केलेली असून, अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापनांना निर्बंध घातले आहेत. त्यास सर्व नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद द्यावी. तसेच माझे कुटूंब माझी जबाबदारी याप्रमाणे सर्वांनी मास्कचा वापर केला पाहिजे. नागरिकांनी आवश्यकता नसताना घराबाहेर पडू नये व सामाजिक अंतर (सोशल डिस्टसिंगचे) काटेकोरपणे पालन करावे. राज्याचे मुख्यमंत्री श्री. उद्धवजी ठाकरे यांनी देशामध्ये प्रथमच लॉकडाऊनमुळे गरीब व व्यवसायिक गरजु लोकांना थेट मदत करणेचे जाहिर केले आहे. मी त्याबद्दल सातत्याने याबाबतची मागणी करत होतो. ते आज पुर्ण होत असलेने मा. मुख्यमंत्री महोदय व महाविकास आघाडी सरकारला धन्यवाद देतो. यावेळी रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मानित करणेत आले. 

या कार्यक्रमास काँग्रेस प्रदेश प्रतिनिधी श्री. उदयसिंह पाटील, जिल्हा काँग्रेस अध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, प्रदेश युवक उपाध्यक्ष श्री.शिवराज मोरे, जि.प.सदस्य श्री. निवासराव थोरात, श्री. इंद्रजित चव्हाण, श्री.इंद्रजित गुजर, मलकापूर नगरपरिषदेचे नगराध्यक्षा सौ. निलम येडगे, उपनगराध्यक्ष श्री. मनोहर शिंदे, नगरसेवक श्री. शहाजी पाटील, श्री.आनंदराव सुतार, श्री.जयंत कुराडे, श्री.किशोर येडगे, नगरसेविका सौ.गितांजली पाटील, सौ.आनंदी शिंदे, सौ.पुजा चव्हाण, सौ. स्वाती तुपे, सौ. नंदा भोसले तसेच श्री. नरेंद्र पाटील, प्राध्यापक. धनाजी काटकर, श्री.रंगराव थोरात, श्री.वैभव थोरात, तसेच यशवंतराव चव्हाण कराड बँकेचे सर्व अधिकारी उपस्थित होते. 

सदर रक्तदान शिबीरास सर्व नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. सदर रक्तदान शिबीरावेळी मलकापूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री. राहुल मर्ढेकर, मलकापूर शहराचे नागरिक श्री. संतोष कराळे, श्री. अभिजीत शिंदे, श्री. धनराज शिंदे, सौ. विद्याताई थोरवडे तसेच अहिल्यानगर, शिवाजीनगर, लक्ष्मीनगर व जय मल्हार कॉलनी या परिसरातील नागरिकांनी व मा. आ. पृथ्वीराज चव्हाण (बाबा) यांच्या चालकापासून ते वरिष्ठ अधिकाऱ्यापर्यंत अशा एकूण 130 नागरिकांनी रक्तदान शिबीरास रक्तदान देऊन प्रतिसाद दिला.