कुंभारगाव येथे कोविशील्ड लसीकरणास उत्स्फूर्त प्रतिसाद.

 


जेष्ठ नेते भगवानराव पाटील लस घेताना.

तळमावले|कृष्णाकाठ वृत्तसेवा :
कुंभारगाव ता. पाटण येथे कोविशील्ड लसीकरणास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. प्राथमिक आरोग्य केंद्र तळमवाले यांचे विद्यमाने आणि कुंभारगाव ग्रामपंचायत यांचे सहकार्यातून कोविड, 19, प्रतिबंध लस 200 नागरीकांना देण्यात आली.      

या मोहिमेत गावातील, वाडीवस्तीतील नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. या लसीकरणात जेष्ठ नेते भगवानराव पाटील आजी, माजी उपसरपंच यांनीही लस घेतली. या वेळी उपस्थित तळमावले प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ उमेश गोजारी, डॉ मंगेश खबाले, आरोग्य सहाय्यक जे एफ पावरा,CHO सुप्रिया यादव, ANM ए एस कांबळे,एस डी पवार, आशा वर्कर सुनीता सुतार, मनीषा शिंदे, संगीता कांबळे. कुंभारगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच सारिका पाटणकर, उपसरपंच राजेंद्र चव्हाण, ग्रामसेवक अनिल जाधव, माजी उपसरपंच राजेंद्र पाटील, पोलीस प्रशासनाच्या वतीने हावालदार खराटे, अजय माने, पोलीस पाटील अमित शिंदे, प्रवीण मोरे, कुंभारगाव ग्रामपंचायतीचे कर्मचारी यांनी लसीकरण यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.