उंडाळे | कृष्णाकाठ वृत्तसेवा :
ग्रामीण विकास शिक्षण संस्था, उंडाळेच्या श्री.बाळसिद्ध विद्यालय,घोगाव या विद्यालयातील कु.तैसिन अब्बास मकानदार इ.८ वी मधील विद्यार्थिनीने
६वी ते ८वी गटामध्ये पंचायत समिती कराड व जि.प.सातारा आयोजित ऑनलाईन "बेटी बचाओ बेटी पढ़ाओ" अभियान अंतर्गत तालुका स्तरीय स्पर्धांचे आयोजन केले होते.
या उपक्रमात कु.तैसिन मकानदार हिने एकपात्री प्रयोग "हिरकणी" अभिनयाने साक्षात साकारली होती.५ मि.चा व्हीडीओ तयार करुन शिक्षण विभाग कराड यांऩा पाठवला होता.
त्या स्पर्धेचा निकाल नुकताच गटशिक्षणाधिकारी कराड व शिक्षण विभाग यांनी जाहीर केला यामध्ये या विद्यार्थिनीस प्रथम क्रमांक एकपात्री प्रयोगासाठी घोषित झाला.
या तिच्या यशाबद्दल विविध स्तरातून कौतुक होत आहे.तिच्या यशाबद्दल उंडाळे केंद्राचे केंद्रप्रमुख श्री.सदाशिव आमणे , श्री.बाळसिद्ध विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.हणमंत सूर्यवंशी, शिक्षक बालाजी मुंढे,सचिन चव्हाण,गणेश तपासे,भालचंद्र आंबवडे,रविंद्र पाटील तसेच पालक,ग्रामस्थ,हितचिंतक,आजी-माजी विद्यार्थी यांनी अभिनंद केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा ही दिल्या.