मुंबई पालिकेने कोरोना उपायांसाठी नगरसेवकनिधी खर्चाची परवानगी द्यावी नगरसेविका सोनम जामसुतकर यांची आयुक्तांकडे मागणी.


मुंबई | कृष्णाकाठ वृत्तसेवा : मुंबईत कोरोनाची दुसरी लाट आली असून यावर विविध उपाययोजना करण्यासाठी मागील आर्थिक वर्षाप्रमाणे यंदाही नगरसेवकांना नगरसेवक निधी खर्च करण्याची महापालिकेने परवानगी द्यावी अशी मागणी प्रभाग क्रमांक २१० च्या नगरसेविका सोनम मनोज जामसुतकर यांनी पालिका आयुक्तांकडे लेखी पत्राद्वारे केली आहे .

नगरसेविका सोनम जामसुतकर यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की ,

मुंबईतील रुग्णसंख्या रोज सुमारे ९ हजारात जात आहे यामुळे आरोग्य यंत्रणेसह पालिका यंत्रणेवरही ताण पडत आहे. बरेच रुग्ण उपचार घेत आहेत.त्यांच्या घरी सॅनिटायझ करण्यासाठी पालिकेचे पथक आठ ते दहा दिवसांनी पोहचत आहे.

त्यातुलनेत अशा रुग्णांची माहीती नगरसेवकांच्या माध्यमातून मिळाल्यानंतर त्याच दिवशी सॅनिटायझ केले जावू शकते.त्यामुळे मागील आर्थिक वर्षांत ज्याकारे सॅनिटायझर, मास्क तसेच हातमोजे व इतर साहीत्य घेण्यासाठी नगरसेवक निधीतून सर्वप्रथम १० लाख रुपये आणि नंतर ५ लाख याप्रमाणे १५ लाख रुपयांचा निधी खर्च करण्यास परवानगी दिली होती. तशीच खर्चाची परवानगी यंदाही दिली जावी,तसेच यातून सध्याच्या गरजेच्या ऑक्सिजन कॉन्सीट्रेटर्स

खरेदी करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी सोनम जामसुतकर यांनी केली आहे.