भाजपानेच रेमडेसिविर इंजेक्शन्सचा काळा बाजार केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप


मुंबई | कृष्णाकाठ वृत्तसेवा : राज्यात भाजपाकडूनच कोरोनावरील रेमडेसिविर इंजेक्शन्सचा काळा बाजार सुरू असून महाराष्ट्र शासनच रेमडेसिविर इंजेक्शन देत नाही असा अपप्रचार भाजपा करत आहे आणि गुजरातमध्ये इंजेक्शन फुकट वाटप करत आहे असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे.

ब्रूक फार्मा कडील इंजेक्शनचे वाटप हॉटेल मधून आठ तारखेला केले. त्यानंतर पुन्हा बारा तारखेला पुन्हा इंजेक्शनचे वाटप केले. त्यांच्याकडे महाराष्ट्र शासनाचा तसेच दिव दमन चा कोणताही परवाना त्यांच्याकडे दिला होता का असा सवाल नवाब मलिक यांनी केला आहे.तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली असून भाजपच्या कार्यालयात इंजेक्शन्स चा साठा होता असा आरोप त्यांनी केला आहे.

Popular posts
योगेश टोंपे व मीना साळुंखे यांच्या कार्याला पाटणच्या जनतेचा सलाम!
इमेज
आंबेघर येथे दरड कोसळल्याने 3 कुटुंब मातीच्या ढिगाऱ्याखाली.
इमेज
सातारा जिल्हाधिकाऱ्यांचा नवा आदेश ; 'या' वेळेत सर्व दुकाने, आस्थापनांना परवानगी
इमेज
काळगाव विभागात पावसाचा कहर ; जोशीवाडी येथील लोक रात्रीच झाले स्थलांतरीत.
इमेज
पालकमंत्री बाळासाहेब पाटील व गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांची आंबेघरला भेट शासनाकडून सर्वतोपरी मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार
इमेज